मुंबई : आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात बंगळूरूची टीम एका वेळल्या अंदाजात दिसून येणार आहे. आजच्या सामन्यात बंगळूरूची टीम हिरवी जर्सी परिधान करेल. रेड आर्मी प्रत्येक सिझनला त्‍याच्‍या ग्रुप स्टेजच्‍या एका मॅचमध्‍ये हिरवी जर्सी घालून मैदानात उतरते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

RCB ने 2011 मध्ये हा उपक्रम सुरू केला आणि तेव्हापासून हा त्यांच्या मोहिमेचा कायमचा भाग झाला आहे. या वर्षी आरसीबीचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ पृथ्वीला स्वच्छ आणि हिरवीगार ठेवण्यासंदर्भात जागरूकता वाढवण्यासाठी ही जर्सी घालणार करतील. आरसीबी टीमने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 



फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील टीम आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. टूर्नामेंटमध्‍ये या दोन्ही  दोन्ही टीम्स एकदा आमनेसामने आल्या होत्या. त्यावेळी हैदराबादने 68 रन्समध्ये बंगळूरूला ऑल आऊट केलं होतं. 


दरम्यान दुसरीकडे आयपीएलच्या 53 व्या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सने त्यांच्या जर्सीवर आईच्या नावाचा उल्लेख केला होता. लखनऊच्या टीमने पूर्वसंध्येलाच मदर्स डे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेट केला. कोलकात्याविरूद्धच्या सामन्यात लखनौचे खेळाडू आपल्या आईचे नाव असलेली जर्सी घालून मैदानावर उतरले होते.