पुणे : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 49 वा सामना आज (4 मे) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये (Gahunje Stadium) करण्यात आलं आहे. (rcb vs csk ipl 2022 royal challengers banglore vs chennai super kings preview)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीबीच्या नेतृत्वाची जबाबदारी ही फॅफ डु प्लेसीसकडे आहे. तर चेन्नईची कॅप्टन्सी महेंद्रसिंह धोनीकडे आहे. या मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने भिडणार आहेत.


या आधी 12 एप्रिलला दोन्ही टीम आमनेसामने भिडले होते. या सामन्यात चेन्नईने आरसीबीवर 23 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात आरसीबी या पराभवाचा वचपा घेण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. 


चेन्नईसाठी 'करो या मरो'


चेन्नईसाठी हा सामना 'करो या मरो'चा असणार आहे. चेन्नईची या मोसमातील रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वात निराशाजनक सुरुवात राहिली. चेन्नईला जाडेजाच्या नेतृत्वात 8 पैकी 2 सामन्यातच विजय मिळवता आला. 


या अपयशामुळे जाडेजाने चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर धोनीने पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. धोनीने कॅप्टन्सी स्वीकारल्यानंतर चेन्नईला विजय मिळवून दिला. त्यामुळे चेन्नईचे 9 सामन्यात 3 विजयासह 6 पॉइंट्स झाले आहेत. 


चेन्नईच्या प्लेऑफच्या आशा कायम आहेत. या आशा कायम ठेवण्यासाठी चेन्नईला आजचा सामना जिंकावा लागणार आहे. थोडक्यात काय तर चेन्नईसाठी हा सामना 'करो या मरो' असा असणार आहे.


त्यामुळे चेन्नई हा सामना जिंकून आव्हान कायम राखणार की आरसीबी वरचढ ठरणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.


दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन  


चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉन्वे, रोबिन उथप्पा, अंबती रायडू, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर आणि कॅप्टन), रवींद्र जडेजा, मोईन अली/ड्वेन ब्रावो/मिचेल सेंटनर, ड्वेन प्रिटोरियस, महीश तीक्ष्णा, सिमरजीत सिंह आणि मुकेश चौधरी.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटिदार, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदु हसारंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जोश हेजलवुड.