भारत-पाकिस्तान क्रिकेट सिरीजबाबत आयसीसीच्या अध्यक्षांनी अशी दिली प्रतिक्रिया
मागील 13 वर्षांपासून एकही कसोटी मालिका खेळली गेलेली नाही.
नवी दिल्ली : आयसीसीच्या नव्या अध्यक्षांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिरीज पाहायला मिळू शकते का याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लवकरच द्विपक्षीय मालिका लवकरच खेळता येईल याची खात्री करण्याचा कोणताही अधिकार आपल्याकडे नाही. भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका नेहमीच राजकीय संबंधांवर अवलंबून असते.
विशेष म्हणजे या दोन आशियाई देशांमध्ये मागील 13 वर्षांपासून एकही कसोटी मालिका खेळली गेलेली नाही. 2007 मध्ये जेव्हा पाकिस्तानने भारतात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली होती तेव्हा अखेरचा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. भारतीय संघ 2006 मध्ये पाकिस्तानात गेला होता. पाकिस्तानने 2012 मध्ये एक वनडे आणि टी20 सीरीज भारतात खेळली होती.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2012 मध्ये शेवटची सिरीज खेळली गेली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यात त्यानंतर सामना फक्त आयसीसी इवेंट्समध्ये झाला आहे. आयसीसीचे नवे चेअरमन बार्कले यांनी म्हटलं की, मी भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यामध्ये काही बोलू शकत नाही. कारण यांच्यातील सामने हे भू-राजकीय मुद्द्यांवर आधारीत आहे. जे माझ्या अधिकार क्षेत्राच्या वर आहे.
'आयसीसी या दोन्ही देशांमध्ये एक सूत्रधार म्हणून भूमिका पार पाडेल. पण भारत आणि पाकिस्तान सरकारच्या हातात हा निर्णय आहे. क्रिकेटच्या दृष्टिकोणातून आपण या दोन्ही देशांना एकत्र खेळताना पाहणं पसंद करतो.' असं ही बार्कले म्हणाले.