BCCI च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटमध्ये मोठा बदल; काय आहे नेमकं कारण?
ट्विटरच्या ऑपरेशन मोडमध्ये बरेच बदल केले गेले आहेत.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) ने जेव्हापासून ट्विटर (Twitter) खरेदी केलं आहे, तेव्हापासून ट्विटर देखील फार चर्चेत राहू लागलंय. ट्विटर खरेदी केल्यानंतर त्याच्या ऑपरेशन मोडमध्ये बरेच बदल केले गेले आहेत. दरम्यान मस्क यांच्या एका घोषणेनंतर फार चर्चा सुरु झाली. ही घोषणा होती ती, वेरिफाईड अकाऊंटबाबतची (Verified Accounts). या घोषणेमध्ये ट्विटर युझर्सना ब्लू टिक्ससाठी $8 द्यावे लागतील असं म्हटलं होतं.
तीन भागांमध्ये विभागले जातील Verified Accounts
अशी पुष्टी करण्यात आली आहे की, ब्लू टिकच्या जागी Verified Account ना तीन भागांमध्ये विभागलं जाईल, हे तिन्ही रंग वेगवेगळ्या रंगाचे असतील. दरम्यान हे बदल भारतात दिसून आले असून लोकं मात्र या बदलाने हैराण झाले आहेत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) च्या अकाऊंटच्या पुढेही ब्लू टिक होती, मात्र आता आजपासून गोल्डन टिक पहायला मिळतेय.
या कारणाने बीसीसीआयला मिळाली गोल्डन टिक
ट्विटरच्या पॉलिसीनुसार, व्हेरिफाईड कंपन्या किंवा अधिकृत व्यावसायिक खात्यांना गोल्डन टिक वाटप देण्यात आलं आहे. यामुळेच बीसीसीआयला ब्लू टिकच्या ऐवजी गोल्डन टिक मिळालं आहे. Verified सरकारी खात्यांसाठी ग्रे टिक आणि व्यक्तींसाठी ब्लू टिक देण्याची पॉलिसी आहे.
पेड वेरिफिकेशनबाबत सध्या कोणताही निर्णय नाही
ट्विटरचे पेड-फॉर व्हेरिफिकेशन फीचर सोमवारी पुन्हा एकदा सुरू झाले आहे. गेल्या महिन्यात ते थांबवण्यात आले होते. याची किंमत अजूनही महिन्याला 8 डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे. परंतु आता Apple डिव्हाइसवर Twitter अॅप वापरणाऱ्यांसाठी 11 डॉलर्स सबस्क्रिप्शन चार्ज घेण्यात येणार आहे.