केप टाऊन :  दक्षिण आफ्रिकेच्या शेन डॅड्सवेलनं वन-डे क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. त्यानं 490 रन्सची स्फोटक इनिंग खेळत नवा इतिहास रचला. डॅड्सवेलनं 151 बॉल्समध्ये 57 सिक्स आणि 27 फोर च्या सहाय्यानं 490 रन्स करण्याची किमया साधली. 


एका मॅचमध्ये भीमपराक्रम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक क्रिकेटमध्ये झालेल्या एका मॅचमध्ये त्यानं हा भीमपराक्रम केला. पोच ड्रॉपविरुद्धच्या लढतीत एनडब्ल्यूयू पुकेकडून खेळताना 490 रन्स करत आपल्या टीमला 50 ओव्हर्समध्ये 677 रन्सपर्यंत मजल मारुन दिली. 


151 बॉल्समध्ये 490 रन्स


एनडब्ल्यूयू पुके टीमनं ही लढत 387 रन्सनं जिंकली. डॅड्सवेलनं 151 बॉल्समध्ये 57 सिक्स आणि 27 फोर च्या सहाय्यानं 490 रन्स करण्याची किमया साधली.