१९८३ वर्ल्ड कपवरच्या चित्रपट प्रदर्शनाची तारीख ठरली, हा अभिनेता मुख्य भूमिकेत
१९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वात भारतानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला.
मुंबई : १९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वात भारतानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला. याच वर्ल्ड कप विजयाच्या आठवणींवर '८३' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ३० ऑगस्ट २०१९ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. कबीर खाननं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
रणवीर सिंग या चित्रपटामध्ये कपिल देवची भूमिका करत आहे. कपिल देवच्या नेतृत्वात भारतानं कशाप्रकारे तेव्हाची विश्वविजेती टीम वेस्ट इंडिजला धूळ चारली याची गोष्ट या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. याआधी एप्रिल २०१९ला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा दिग्दर्शक-निर्मात्यांचा मानस होता. चित्रपटाचं नाव निश्चित होण्यापूर्वीच चित्रपटाच्या प्रदर्शनाचा महिना निश्चित करण्यात आला होता.
१९८३ साली लहान असताना मी भारताला वर्ल्ड कप जिंकलेलं बघितलं होतं. या विजयामुळे भारतातील क्रिकेट संपूर्णपणे बदललं. ज्यावेळी या चित्रपटाविषयी विचार करायला सुरुवात केली तेव्हापासूनच कपिलची भूमिका रणवीर सिंग करेल हे माझ्या डोक्यात निश्चित होतं, असं कबीर खान म्हणालाय.