Yashasvi Jaiswal: भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची टेस्ट सिरीज सुरू आहे. या सिरीजमधील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यावर टीम इंडियाचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात दिसून येतंय. भारताच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जयस्वालने शतक ठोकलं. आक्रमक पद्धतीने खेळून त्याने चांगसा खेळ दाखवला. मात्र सेंच्युरी झाल्यानंतर जयस्वासल 'रिटायर्ड हर्ट' झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्ट सामन्यात यशस्वी जयस्वाल 'रिटायर्ड हर्ट' झाला होता. भारतासाठी शतक पूर्ण केल्यानंतर यशस्वी जयस्वालला पाठीचा काही त्रास झाला होता. यानंतर त्याने 'रिटायर हर्ट' होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आता प्रश्न उपस्थित होतोय की, टीम इंडियाचा ओपनर जयस्वाल पुन्हा एकदा फलंदाजी करू शकणार की नाही? जाणून घेऊया याबाबत आयसीसीचा नियम काय सांगतो?


इंग्लंडंच्या टीमचा पहिला डाव 319 रन्सवर आटोपला. यावेळी टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माला मोठी खेळी साकारता आली नाही. मात्र ओपनर यशस्वी जयस्वालने शतकी खेली केली. यशस्वीने 133 बॉल्समध्ये 9 फोर आणि 5 सिक्स लगावत 104 रन्स केल्यात. शतक पूर्ण केल्यानंतर जयस्वालला पाठदुखी समस्या दिसून आली. त्यानंतर फिजिओ मैदानात आला आणि त्याच्याकडून उपचार घेतल्यानंतर जयस्वालने पुन्हा फलंदाजीला सुरुवात केली. पण त्याचा त्रास काही कमी झाला नाही. अखेरीस तो 'रिटायर्ड हर्ट' झाला. 


पुन्हा बॅटींग करू शकणार का जयस्वाल?


'रिटायर्ड हर्ट' झाल्यानंतर यशस्वी पुन्हा फलंदाजीला उतरणार का? मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या नियम 25.4.2 नुसार, दुखापत, आजार किंवा इतर कोणत्याही कारणामुळे फलंदाज रिटायर झाल्यास तो त्याच ठिकाणाहून आपला डाव पुन्हा सुरू करू शकतो. आता यशस्वी जैस्वाल पुन्हा फलंदाजीला उतरणार की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे सामन्याच्या चौथ्या दिवशी चाहत्याचं यशस्वीवर लक्ष असणार आहे. 


टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.


इंग्लंड : बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.