घटस्फोटाच्या चर्चेवर Hardik Pandya ची प्रतिक्रिया, रिकी पॉटिंगच्या प्रश्नावर दोन शब्दात दिलं उत्तर, पाहा Video
Hardik Pandya On divorce rumours : पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबतच्या (Natasa Stankovic) घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना हार्दिक पांड्याने प्रथम प्रतिक्रिया दिली आहे. रिकी पॉटिंगचा (ricky ponting) व्हिडीओ व्हायरल झालाय.
Ricky Ponting Hardik Pandya Video : गेल्या महिन्यांपासून टीम इंडियाला ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं म्हटलं जातंय. नताशा आणि हार्दिक घटस्फोट लवकरच घेणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. हार्दिक आणि नताशा सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेवर मौन बाळगून आहेत. अशातच दोघांनी देखील या प्रकरणावर उत्तर दिलं नाही. अशातच आता हार्दिक पांड्याने या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. रिकी पॉटिंगने विचारलेल्या प्रश्नावर हार्दिकने दोन शब्दात (Hardik Pandya On divorce rumours) उत्तर दिलं.
यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या मुंबईचा कॅप्टन असून देखील नताशा त्याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये आली नव्हती. याशिवाय नताशाने इन्ट्राग्रामवरून पंड्या आडनाव काढून टाकल्याचं समोर आलं होतं. या सर्व गोष्टींमुळे हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यातील घटस्फोटाची चर्चेला उधाण आलं होतं. अशातच आता हार्दिक पांड्याने सर्वकाही ठिक असल्याचं म्हटलं आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
झालं असं की, ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉटिंग सध्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये समालोचनाची जबाबदारी सांभाळतोय. अशातच आता त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा अनुभव सांगतोय. त्याचवेळी एका व्हिडीओमध्ये तो टीम इंडिया सराव करत असताना मैदानात येतो. तेव्हा तो कुलदीप यादवसोबत चर्चे करतो. त्यानंतर त्याने पांड्याची देखील भेट घेतली. त्यावेळी रिकी कसं चाललंय? कुटूंब कसं आहे? असा सवाल विचारला. त्यावेळी रिकी पॉटिंगने उत्तर दिलं. सर्वजण मजेत आहेत. सर्व ठिक आहे. तू सांग... असं रिकी म्हणतो.
दरम्यान, रिकी पॉटिंगच्या प्रश्नावर उत्तर देताना, सर्वकाही ठिक आहे (All good. All sweet), असं हार्दिक पांड्या म्हटलं आहे. त्यामुळे आता घटस्फोटाच्या चर्चेवर फुलस्टॉप लावला गेला आहे. त्यामुळे आता हार्दिक पांड्याच्या चाहत्यांनी देखील सुटकेचा श्वास घेतला आहे. आयसीसीने हा व्हिडीओ शेअर केलाय.
पाहा Video