मुंबई : बीसीसीआयने न्यूझीलंडविरूध्द तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. संघात दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. युवा क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मो. सिराज यांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी मो. सिराज खेळायचा. 22 वर्षीय सिराज हा जलद गोलंदाज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादच्या या क्रिकेटरचे पिता रिक्षा चालवतात. परंतु त्याच्या कष्टाचं चीज आज झालं आहे. आज त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आयपीएल 10 लिलावामध्ये, हैदराबाद सनराईजने या खेळाडूला 2.60 कोटी रुपयांना विकत घेतले होते.


आयपीएल 10 लिलावात सर्वाधिक रक्कम मिळवणारा सिराज चौथा भारतीय खेळाडू ठरला. 22 वर्षीय सिराज प्रथम 2015-16 मध्ये रणजी सिरीजमधून फर्स्टक्लास मॅचमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर सयैद मुस्ताक अली ट्रॉफीच्या माध्यमातून त्याने 2 जानेवारी 2016 रोजी टी -20 सामना खेळणं सुरु केलं. वर्ष 2017 मध्ये, त्याला पहिल्यांदा आयपीएलमध्ये सामील होण्याची संधी मिळाली.