Rinku Singh: मंगळवारी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील टी-20 सिरीजमध्ये टीम इंडियाने कब्जा मिळवला. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये 5 बॉल्स राखून श्रीलंकेला क्लिन स्विप दिला. यावेळी पहिल्या दोन टी-20 जिंकून सिरीज जिंकणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या टीमने तिसऱ्या टी-20मध्ये रोमहर्षक विजयाची नोंद केली. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा सामना बरोबरीत सुटला आणि त्यानंतर मेन इन ब्लूने सुपर ओव्हरमध्ये सहज विजय मिळवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-20 सिरीजमध्ये विजय मिळवल्यानंतर रिंकू सिंगला खास पुरस्कार देण्यात आला. या सिरीजमध्ये रिंकू केवळ 2 रन्स करू शकला होता पण टीम इंडियाने त्याला खास पुरस्कार दिला. महत्त्वाच म्हणजे हा पुरस्कार मिळाल्याच्या आनंदाच्या भरात तो मुख्य कोच गौतम गंभीरला विसरला.


रिंकू सिंहला मिळाला खास अवॉर्ड


या सिरीजमध्ये रिंकू सिंग फलंदाजीत अपयशी ठरला पण टीम इंडियाने शेवटच्या सामन्यात त्याने गोलंदाजीमध्ये कमाल केली. रिंकू सिंगने चांगल्या गोलंदाजी शिवाय उत्तम मैदानी क्षेत्ररक्षण केलं आणि त्यामुळेच फिल्डींग कोच टी. दिलीप यांनी त्याला सर्वोत्कृष्ट फिल्डरचा पुरस्कार दिला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर रिंकू सिंगला खूप आनंद झाला आणि या खेळाडूने God’s plan baby चा नारा दिला. मात्र, यादरम्यान तो मुख्य कोच गौतम गंभीर याला हात मिळवण्यास विसरून गेला. 



गौतम गंभीरला विसरला रिंकू


रिंकू सिंगला सहाय्यक प्रशिक्षक टेन डेस्केटी यांनी सर्वोत्तम फिल्डर म्हणून मेडल दिलं. त्यानंतर खेळाडूने त्याच्याशी हात मिळवला. यानंतर त्याने फिल्डींग कोच दिलीप यांना मिठी मारली आणि त्यांच्याशी हात मिळवला. गौतम गंभीर त्याच्या शेजारी उभा होता आणि रिंकू सिंग त्याला भेटायला विसरला. त्यानंतर गौतम गंभीरने रिंकू सिंगला आठवण करून दिली की तोही इथे उभा आहे आणि मग या रिंकून त्याला मिठी मारली. अर्थात रिंकू सिंगने हे जाणूनबुजून केलं नाही. मात्र असं असून या खेळाडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.