भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंगला कोलकाता नाईट रायडर्स संघाने 13 कोटींमध्ये रिटेन केलं आहे. आयपीएल 2023 मध्ये यश दयालच्या गोलंदाजीवर सलग 5 षटकार ठोकल्यानंतर रिंकू सिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली होती. संघांनी रिटेन केलेल्या टॉप खेळाडूंमध्ये रिंकूचा समावेश आहे. आयपीएल रिटेंशनची घोषणा झाल्यानंतर अनेक रिपोर्ट्स आणि सोशल मीडिया साईट्सवरुन रिंकू सिंगने अलिगडमधील द गोल्डन इस्टेट परिसरात आलिशान बंगला खरेदी केल्याचा दावा केला आहे. काहींच्या मते या 500 स्क्वेअर फुटातील घराची किंमत 3 कोटी 50 लाख आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता नाईट रायडर्स संघाने गतवर्षीचा विजेता कर्णधार श्रेयस अय्यरला रिलीज केलं आहे. 146.86 च्या स्ट्राइक रेटने दोन अर्धशतकांसह 14 डावात 351 धावांची त्याची फलंदाजीची आकडेवारी हे रिलीज करण्यामागील कारण असू शकतं असं अनेकांचं म्हणणं आहे. दुसरी बाजू म्हणजे. KKR टॉप ऑर्डरने फारसे पर्याय सोडले नाहीत. त्याचा फिटनेसह महत्त्वाचं कारण असू शकतं. फिटनेसमुळे 2023 च्या हंगामाला तो मुकला होता. 


कारण काहीही असले तरी, एक गोष्ट नक्की आहे की श्रेयस अय्यर ॲडम गिलख्रिस्ट (2009 मध्ये जेतेपद पटकावल्यानंतर 2011 मध्ये डेक्कन चार्जर्सने रिलीज केलेला, 2010 मध्ये उपांत्य फेरीत), डेव्हिड वॉर्नर (2016 चे विजेतेपद आणि अनेक प्लेऑफ फिनिशर्समध्ये असूनही 2022 मध्ये सनरायजर्स हैदराबादने रिलीज केलेल्या) यांच्यासह आयपीएलमधील सर्वात दुर्दैवी कर्णधारांपैकी एक ठरला आहे.


यावेळी फ्रँचायझीजने अत्यंत धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यांनी अनुभवी,  भारतीय, परदेशी खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट भारतीय अनकॅप्ड/ नवख्या खेळाडूंवर विश्वास ठेवला आहे. 


सर्व फ्रँचायझींमध्ये राखून ठेवलेल्या एकूण 46 खेळाडूंपैकी 36 खेळाडू भारतीय आहेत. यापैकी 10 खेळाडू अनकॅप्ड भारतीय स्टार आहेत. ज्यामध्ये अभिषेक पोरेल, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रमणदीप सिंग, हर्षित राणा, मोहसिन खान, आयुष बडोनी, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, यश दयाल यांचा समावेश आहे. 


तसंच, इतर 24 भारतीय खेळाडूंपैकी 13 खेळाडूंनी 30 पेक्षा कमी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि आठ खेळाडूंनी भारतासाठी 10 किंवा त्यापेक्षा कमी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 24 अनकॅप्ड खेळाडूंपैकी कोणालाही भारतासाठी सर्व फॉर्मेटचा अनुभव नाही आणि ध्रुव जुरेल आणि रजत पाटीदार या दोघांना फक्त कसोटी क्रिकेटचा अनुभव आहे.


उल्लेखनीय म्हणजे, भारतासाठी नुकतेच आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला जुरेलचं नशीब चांगलंच चमकलं आहे. त्याला 20 लाखांहून थेट 14 कोटींची वाढ मिळाली आहे.