इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. या मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएलच्या प्रत्येक टीमला केवळ 6 प्लेअर्स रिटेन करावे लागणार असून उर्वरित सर्व प्लेअर्सला त्यांना रिलीज करावे लागणार आहे. आयपीएल 2024 चं विजेतेपदं कोलकाता नाईट रायडर्स या टीमने जिंकलं होतं. या टीमचा स्टार प्लेअर रिंकू सिंहने मेगा ऑक्शनपूर्वी त्याला कोणत्या टीममध्ये जायला आवडेल याविषयी भाष्य केलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिंकू सिंह आयपीएलमध्ये मागील 6 वर्षांपासून कोलकाता नाईट रायडर्स सोबत जोडलेला आहे. मात्र तो 2023 च्या आयपीएलमध्ये गुजरात जाएंट्स विरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये 5 बॉलवर 5 सिक्स मारल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यानंतर रिंकूला टीम इंडियाकडून टी 20 आणि वनडे सिरीज खेळण्याची सुद्धा संधी मिळाली. मात्र आयपीएल 2024 हे वर्ष रिंकूसाठी खास ठरले नाही. या सीजनमध्ये रिंकूला आपला परफॉर्मन्स दाखवता आला नाही. आता लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार असून यापूर्वी रिंकूने जर तो कोलकाता नाईट रायडर्समधून रिलीज झाला तर त्याला कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल याविषयी सांगितले.  


हेही वाचा : विनेश फोगटनं साजरं केलं रक्षाबंधन, भावाकडून मिळालेलं गिफ्ट पाहून झाली Shocked!


स्पोर्ट्स तक ला मुलाखत देताना रिंकूने म्हंटले, "जर मला आयपीएल 2025 च्या ऑक्शनपूर्वी केकेआरने मला रिलीज केलं तर मी आरसीबीमध्ये जाऊ इच्छितो. याचा सोपं कारण आहे विराट कोहली". रिंकू सिंहचं हे वक्तव्य आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  रिंकूच्या या वक्तव्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. 


रिंकू सिंहची कारकीर्द : 


कोलकाता नाईट रायडर्सने रिंकू सिंहला आयपीएल 2018 मध्ये विकत घेतले होते. रिंकू सिंहला सुरुवातीच्या काही सीजनमध्ये खेळण्यासाठी खूप कमी संधी मिळाल्या. मात्र तो आयपीएल 2023 मधील दमदार परफॉर्मन्सनंतर लोकप्रिय झाला. रिंकू सिंह आयपीएलमध्ये आतापर्यंत 45 सामने खेळला आहे. यात त्याने 143.34 च्या स्ट्राईक रेटने 30.79 च्या ऍव्हरेजने 893 धावा केल्या आहेत. याशिवाय रिंकूने दोन वनडे सामने तसेच 23 टी 20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले.