Rishabh Pant Accident : वर्षाचा शेवट कुटुंबासमवेत करण्यासाठी अनेकांनीच बेत आखले आहेत. काहीजण यानिमित्तानं ठरलेल्या बेतानुसार अपेक्षित ठिकाणांसाठी रवानाही झाले आहेत. ऋषभ पंतनंही (rishabh pant) असंच काहीतरी ठरवलं होतं. पण, हा दिवसच त्याचा नव्हता. कारण, (Rishabh Pant Car Accident) रुरकी येथे असणाऱ्या नरसन सीमेवरील हम्मादपूर गावाजवळ त्याच्या कारला भीषण अपघात झाला. अतिप्रचंड वेगात असणारी पंतची कार (rishabh pant car) पहाटेच्या सुमारास डिवायडरला आदळली आणि या अपघातात कारनं पेटही घेतला. पंत कसाबसा या अपघातातून बचावला पण, त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. 


आईला अपघाताची माहिती मिळताच ती हादरली... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी झालेल्या या भीषण अपघाताची माहिती ज्यावेळी ऋषभच्या आईपर्यंत पोहोचली त्यावेळी त्यांना धक्काच बसला. सरोज पंत म्हणजेच ऋषभच्या आईनं तडक रुग्णालय गाठलं. इथं त्यांना सावरणंही कठीण होतं. 


सरप्राईज देण्यासाठी निघालेला ऋषभ? 


सूत्रांच्या माहितीनुसार ऋषभ त्याच्या आईला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी त्याच्या घराकडे निघाला होता. पुढील तीन दिवस तो उत्तराखंडमध्येच राहणार होता. अर्थात त्याच्या नव्या वर्षाची सुरुवात तिथंच होणार होती. पण, हा अपघात झाला आणि ऋषभनं काळ अगदी जवळून पाहिला. गेल्या तीन दिवसांपासून ऋषभची आई त्यानं घरी यावं यासाठी त्याला आग्रह करत होती. अखेर आईला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी तो निघालासुद्धा पण, नशिबानं इतकं मोठं संकट पुढे वाढून ठेवलंय याची त्याला पुसटशीही अपेक्षा नव्हती. 


हेसुद्धा पाहा : Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंतच्या कारचा स्पीड ताशी 200 किमी, पाहा व्हिडिओ...


खुद्द ऋषभनंच अपघातातून काहीसं सावरल्यानंतर आईला आपल्या अपघाताविषयी सांगताना कोणालाही कल्पना न देता दिल्लीहून का निघालो याचं कारण सांगितलं. आईला आनंद मिळावा, यासाठीच तो भल्या पहाटे दिल्लीहून निघाला होता. येत्या दिवसांत उत्तराखंडमध्येही फिरण्याचा त्याचा बेत होता. पण, नशिबापुढे कोणाचं तसुभरही चाललेलं नाही हेच पुन्हा सिद्ध झालं. 


कारचा वेग ताशी 200 किमी? 


शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ऋषभ पंत याचा भीषण अपघात झाला. यामध्ये भारतीय संघातील या युवा क्रिकेटपटू थोडक्यात बचावला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार hlpline वर फोन करत पंतला रुग्णालयात नेण्यात आलं. अपघाताची अनेक कारणं सध्या समोर येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पंतच्या कारचा वेग ताशी 200 किमी इतका होता. कारचा वेग इतका जास्त होता की ज्यावेळी पंतचं नियंत्रण सुटलं तेव्हा कार तीन ते चारवेळा उलटली. सीटबेल्ट आणि एअरबॅग्समुळे इतक्या मोठ्या अपघातातून ऋषभ बचावला.