IND VS AUS 1st Test : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) ही जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगपैकी एक असून याच्या 18 व्या सीजनसाठी लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. या ऑक्शनसाठी देश विदेशातील जवळपास 1500 हुन अधिक खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं होतं. मात्र यापैकी फक्त 574 खेळाडूंना ऑक्शनसाठी शॉर्ट लिस्ट करण्यात आले आहे. पर्थ टेस्ट सुरु असतानाच 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात मेगा ऑक्शन पार पडणार आहे. या ऑक्शनविषयी खेळाडूंमध्ये सुद्धा मोठी उत्सुकतता आहे. तेव्हा पर्थ येथे भारत ऑस्ट्रेलिया सामन्या दरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडू नॅथन लिऑन याने ऋषभशी तो आयपीएलमध्ये कोणत्या संघात जाणार याविषयी बातचीत केली, सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


नेमकं काय घडलं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या टेस्टला सुरुवात झाली. यावेळी दिवसाअंती टीम इंडिया 83  धावांनी आघाडीवर आहे. सामन्यादरम्यान ऋषभ पंत फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा खेळाडू नॅथन लिऑन हा त्याच्या जवळ आला. त्याने ऋषभला विचारले, 'तू आयपीएल ऑक्शनमध्ये कुठे जाणार आहेस' यावर पंतने 'मला माहित नाही' असं उत्तर दिलं. मात्र यावरून ऑस्ट्रेलियन खेळाडू सुद्धा आयपीएल ऑक्शनसाठी किती उत्सुक आहेत हे दिसून आलं. ऋषभ पंतने पाहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना 37 धावा केल्या यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. 


पाहा व्हिडीओ : 



ऋषभ पंतचं भवितव्य ठरणार : 


ऋषभ पंत हा 2016 पासून दिल्ली कॅपिटल्सशी जोडला गेला होता. मात्र आयपीएल 2025 साठी दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिटेन केलं नाही. त्यामुळे पंतने 2 कोटींच्या बेस प्राईजवर ऑक्शनमध्ये स्वतःच नाव नोंदवले. ऋषभ पंत एक उत्तम फलंदाज आणि विकेटकिपर आहे तसेच त्याला कर्णधारपदाचा सुद्धा चांगला अनुभव आहे. त्यामुळे ऋषभला खरेदी करण्यासाठी सीएसके, पंजाब किंग्स, आरसीबी सारख्या मोठ्या फ्रेंचायझी उत्सुक आहेत. ऋषभ पंतवर आयपीएल इतिहासातील सर्वाधिक बोली लागण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे.  


भारताची  प्लेईंग 11: 


केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर) , ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.


ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11: 


उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकिपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड