मुंबई : आयपीएलमध्ये दिल्लीचा फलंदाज ऋषभ पंतने नो बॉलवरून ड्रामा केला होता. याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. आता यावरून दिल्लीचे कोच रिकी पाँटिंग यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ पंत आणि असिस्टंट कोच प्रवीण आमरे यांनी मैदानात केलेल्या हायव्होल्टेज ड्रामानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या ड्रामावर आता रिकी पाँटिंग यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेनंतर आता पुन्हा एकदा या वादाची चर्चा होत आहे. 


जे झालं ते अत्यंत चुकीचं झालं. अंपायरचा निर्णय योग्य नव्हता. मात्र जे झालं त्यासोबत तुम्हाला पुढे जावंच लागेल. आमच्या टीममधील खेळाडू आणि असिस्टंट कोचचं वागणं देखील योग्य नव्हतं. ज्याचा गर्व करावा असं वाटेल. त्यांचही थोडं चुकलं यावरून मी त्यांच्याशी चर्चा केली. 


दिल्ली टीम सध्या अत्यंत कठीण काळातून जात आहे. आधी कोरोनामुळे तणाव होता. टीममध्ये खेळाडूंमध्ये आधीच तणाव, चीड अशी मिश्र भावना होती. त्यासोबत सामनाही अटीतटीचा झाला. त्यामुळे तणावात असल्याने पंतकडून हे घडलं. 


अंपायरने मॅकॉयच्या बॉलवर नो बॉल न दिल्याने चिडलेल्या पंतने टीममधील खेळाडूंना क्रीझ सोडून येण्याचा सल्ला दिला. तर असिस्टंट कोच नियम तोडून मैदानात घुसले. त्यामुळे या दोघांवरही कारवाई करण्यात आली होती. या सगळ्यामुळे वातावरण तापलं होतं. या नो बॉलवरून हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता.