मुंबई : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या भारतीय संघात (Team India) चांगली कामगिरी करतोय. विकेटकीपर म्हणून त्याची कामगिरी चांगली सुधारली आहे. तर बॅटने देखील तो चांगली कामगिरी करत आहे. माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याच्या रिटायरमेंटनंतर पंतचा पर्याय भारतासाठी खुला झाला. पण पंतच्या शिवाय भारतात असे अनेक विकेटकीपर होते. ज्यांना संधी मिळाली. पण पंतने कमी वयात जी कामगिरी केली. त्यामुळे इतरांचं करिअर धोक्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केएस भरत (KS Bharat)


आंध्र प्रदेशचा विकेटकीपर केएस भरतने 69 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 37.58 च्या रनरेटने  3000 हून अधिक रन केलेत. या दरम्यान त्याने 8 शतक आणि 20 अर्धशतकं देखील झळकावली आहेत. इतकंच नाही तर त्याच्या नावावर एक तिहेरी शतक देखील आहे. आयपीएल 2021 मध्ये तो आरसीबी संघात होता. त्याने आपल्या चांगल्या कामगिरीमुळे भारतीय टेस्ट संघात जागा देखील मिळवली. पण पंतमुळे तो टीममध्ये अजून खेळू शकलेला नाही. पंतची चांगली कामगिरी राहिली तर त्याचं करिअर धोक्यात येऊ शकतं.


ईशान किशन (Ishan Kishan)


आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा आणि सध्या चांगली कामगिरीमुळे चर्चेत असणारा ईशान किशन एक चांगला विकेटकीपर देखील आहे. आयपीएल 2020 मध्ये त्याने फक्त 14 सामन्यांमध्ये 516 रन केले होते. टी20 वर्ल्ड कपसाठी त्याला भारतीय संघात जागा ही मिळाली. पण पंतमुळे त्याला संघात येण्याची संधी नाही मिळाली. तो एक ओपनर म्हणून देखील चांगला खेळाडू आहे. पण केएल राहुल आणि रोहित शर्मा असताना त्याला ओपनर म्हणून संधी मिळण्याची शक्यता ही कमी आहे.


संजू सॅमसन (Sanju samson)


संजू सॅमसन भारतीय संघातील आणखी एक चांगला खेळाडू आहे. ज्याने आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने आयपीएलमध्ये 3 शतक देखील झळकावले आहेत. पण पंतमुळे त्याला संघात जास्त संधी मिळाली नाही. त्याने भारतासाठी 10 टी20 सामने आणि 1 वनडे सामना खेळला आहे.