ऋषभ पंत ठरला आयसीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द ईयर
ऋषभ पंतला पहिला आयसीसी अवॉर्ड
दुबई : भारतीय टीमचा विकेटकीपर ऋषभ पंतने आपल्या खेळीने अनेकांचं मन जिंकलं होतं. २०१८ मध्ये त्याने इंग्लंडमध्ये टेस्ट सामन्यात शतक ठोकलं होतं. इंग्लंडमध्ये शतक ठोकणारा तो पहिला भारतीय विकेटकीपर ठरला होता. आयसीसी नुकतात जाहीर केलेल्या आयसीसी अवॉर्ड्समध्ये युवा क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) प्रतिभावान खेळाडू ठरला आहे. २१ वर्षाच्या पंतने आयसीसी मेंस एमर्जिंग क्रिकेटर ऑफ द ईयर (ICC Men's Emerging Cricketer of the Year) २०१८ चा अवॉर्ड मिळवला आहे. आयसीसीच्या २०१८ च्या टेस्ट टीममध्ये देखील त्याला जागा मिळाली आहे. पंतने आतापर्यंत ९ टेस्ट, ३ वनडे आणि १० टी-२० सामने खेळले आहेत.
९ टेस्टमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant)ने दोनदा शतक आणि २ अर्धशतक ठोकले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध देखील झालेल्या ४ टेस्टमध्ये पंतने विकेटकीपिंग शिवाय आपल्या बॅटने देखील चांगली कामगिरी केली. चेतेश्वर पुजारानंतर सर्वाधिक रन करणारा तो खेळाडू ठरला. पंतचा टेस्टमध्ये रनरेट ४९.७१ आहे. नाबाद १५९ रनची त्याची सर्वोतम खेळी आहे.
तीन वनडेमध्ये पंतने ४१ रन, १० टी-२० मध्ये १५७ रन त्याने केले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने सिरीज दरम्यान एडिलेड टेस्टमध्ये ११ कॅच घेतले. एका सामन्यात ११ कॅच घेणारा तो पहिला विकेटकीपर ठरला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलियर्स आणि इंग्लंडच्या जॅक रसेलच्या नावावर देखील ११ कॅच आहेत. आयसीसी अवॉर्ड्समध्ये भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने ICC च्या वनडे आणि टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयरचा पुरस्कार देखील मिळवला आहे. आयसीसीच्या वनडे आणि टेस्ट टीमच्या कर्णधार बनण्याचा मान देखील त्याला मिळाला आहे.