मुंबई : विकेटकीपर आणि बॅटसमन ऋषभ पंत जरा किरकोळ जखमी झाल्यानंतर, एक चांगली बातमी आहे की, असं असूनही तो ऑफ साईडला चांगले शॉटस खेळतोय. ऋषभ पंतचे हे शॉटस पाहून त्याचा कोच जाम खुश झालाय. ऋषभ पंतचे खासगी कोच तारक सिन्हा हे चांगलेच खुश आहेत. ब्रायन लाराने देखील ऋषभ पंत खेळ सुधारतोय असं म्हटलंय. खासगी कोच तारक सिन्हांचं म्हणणं आहे की, ऋषभ पंत हा आता एक परिपक्व क्रिकेटर, समजदार क्रिकेटर होण्याच्या दिशेने जात आहे.
 
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळणाऱ्या ऋषभ पंतवर तो ऑन साईडला खेळतो म्हणून टीका होत होती. असं देखील म्हटलं जात होतं की, ऋषभ पंत हा ऑफ साईड खेळण्यास कमजोर आहे. पण सिन्हा यांचे मोलाचे शब्द आणि ऋषभ पंतची मेहनत रंगात आली आहे. कारण ऋषभ पंत आता ऑफ साईडलाही खूप चांगला खेळतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ पंतचे कोच तारक सिन्हा हे द्रोणाचार्य अवॉर्ड विजेते आहेत. सिन्हा हे ऋषभ पंतला कोव्हिडमुळे भेटू शकले नाहीत. पण त्यांनी फोनवर ऋषभ पंतला मोलाचं मार्गदर्शन करताना मोजक्या शब्दात सांगितलं. 


दौऱ्यावर जाताना फोनवर बोलताना सिन्हा म्हणाले, ''ऋषभ एक गोष्ट नीट लक्षात ठेव, जर तुला टीम इंडियासाठी खेळायचं असेल, तर तुझ्या खेळात आताच सुधारणा करावी लागेल, यासाठी तुला साईड ऑफला देखील खेळावं लागेल. क्रिकेट हा एवढा एडव्हान्स गेम झाला आहे की, तुझ्या खेळातला कमीपणा सर्वजण ओळखून असतात. त्यात सुधार झालाच पाहिजे.''


सिन्हा आता म्हणतात, ऋषभ पंतने खेळात मोठी दुरूस्ती केली, तो एक समझदार क्रिकेटर झाला आहे, तो आधी फक्त षटकार मारण्यासाठीच जास्तवेळा प्रयत्न करत होता. पण आता समझदारीने खेळेल. त्याला कमी चेंडू खेळायला सध्या मिळतायत. तरी तो फॉर्मात आहे. पुढे तो आणखी जबरदस्त खेळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.