मुंबई : आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध राजस्थान झालेल्या सामन्यात पंतचा राडा पाहायला मिळाला. या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांना पुन्हा एकदा धोनीची आठवण झाली. गुरू तसा चेला आणि धोनीकडून हेच शिकलास का अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंत आणि धोनी यांच्या राड्यामागील नेमकं कनेक्शन काय होती. नेटकऱ्यांना पंतच्या राड्यानंतर धोनी का आठवला याबद्दल आज जाणून घेऊया. 


राजस्थान विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये अंपायरने नो बॉलचा निर्णय न दिल्याने पंत चिडला. अंपायरने थर्ड अंपायरचाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे पंतने रागात खेळाडूंना मैदानातून बाहेर बोलावून घेतलं. त्याचं हे वागणं नियमबाह्य होतं. त्याच्या या वागण्यावर कारवाई देखील झाली. 


महेंद्रसिंह धोनीने देखील 2019 मध्ये अशाच एका वादाला तोंड फुटलं होतं. अंपायरचा निर्णय न पटल्याने धोनीनं मैदानात घुसून राडा केला होता. त्यामुळे चाहत्यांना कॅप्टन कूल धोनीचे रौद्र रुप पाहायला मिळालं. 


त्यावेळी देखील आतासारखंच नो बॉलवरून वाद झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे गुरू तसा चेल असं म्हटत नेटकऱ्यांनी दोघांनाही पुन्हा एकदा ट्रोल करायला सुरुवात केली. तोच वाद तसाच राडा पुन्हा एकदा पंत विरुद्ध राजस्थान टीम असा पाहायला मिळाला. 


नेमकं काय प्रकरण? 
शेवटच्या ओव्हरमध्ये तिसरा बॉल हा नो बॉल असल्याचा दावा पंतने केला. मात्र तो फुलटॉस असल्याने नो बॉल न दिल्याचं संजू सॅमसननं सांगितलं. अंपायरने नो बॉल नाही असा निर्णय दिला. त्यावर पंत वैतागला. त्याने तिथे ड्रामा सुरू केला. थर्ड अंपायरचा निर्णय देखील यामध्ये पाहिला नाही. त्यामुळे रागाने पंतने खेळाडूंना मैदान सोडण्यास सांगितलं. 


पंत, शार्दूल ठाकूर आणि असिस्टंट कोच प्रवीण आम्रे यांच्यावर नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अशाप्रकारचं वर्तन हे नियमबाह्य असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.