Best Wicketkeeper in World: भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सीरिजमधून भारतीय विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतने अपघातानंतर अनेक दिवसांनी टेस्ट क्रिकेटमध्ये कमबॅक केले. ऋषभचं हे कमबॅक दमदार राहीलं असून त्याने चेन्नईत झालेल्या बांगलादेश विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात 109 धावा करून शतक लगावले. यासह त्याने विकेटकिपर म्हणून एम एस धोनीने टेस्ट क्रिकेटमध्ये केलेल्या शतकाच्या विक्रमाची सुद्धा बरोबरी केली. कमबॅक सामन्यातच ऋषभ पंतने दमदार खेळी केल्याने त्याची तुलना आता एम एस धोनी आणि ॲडम गिलख्रिस्ट अशा दिग्गज विकेटकिपर फलंदाजांशी केली जातेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये कार अपघात झाला होता. या अपघातात ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती आणि त्याच्या दोन्ही पायांवर सर्जरी सुद्धा करण्यात आली. त्यानंतर तब्बल दिड वर्ष तो क्रिकेटपासून दूर राहिला. अखेर ऋषभ पंतने आयपीएल 2024 मध्ये कमबॅक केले आणि त्यानंतर टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाच्या विजेत्या संघाचाही तो भाग होता. 2022 नंतर आता पुन्हा ऋषभने भारताच्या टेस्ट टीममध्ये कमबॅक केले आणि पहिल्याच सामन्यात मोठी खेळी केली. 


पंतने धोनीच्या विक्रमाशी केली बरोबरी : 


ऋषभने या सामन्यात एम एस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. ऋषभ पंतने बांगलादेश विरुद्ध ठोकलेले शतक हे त्याचे टेस्ट क्रिकेटमधील 6 वे शतक होते. तर यापूर्वी एम एस धोनीने सुद्धा टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून खेळताना 6 शतक लगावली होती. यापूर्वी धोनीपूर्वी भारताच्या कोणत्याही विकेटकिपरला असं  करणं शक्य झालं नव्हतं. मात्र आता ऋषभ पंत येत्या काळात धोनीचा हा रेकॉर्ड मोडू शकतो. टीम इंडियात विकेटकिपर स्थान मिळवण्यासाठी ऋषभ पंत, केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांच्यात मोठी स्पर्धा आहे. 


हेही वाचा : मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू बनणार KKR चा नवा कर्णधार? कोलकाताकडून मोठी ऑफर, श्रेयस अय्यरला झटका


 


कोण आहे सर्वोत्कृष्ट विकेटकिपर फलंदाज?


ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकिपर ॲडम गिलक्रिस्ट हा विकेटकिपर फलंदाज म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 17 शतक झळकावणारा खेळाडू आहे.  गिलक्रिस्ट विकेटकिपर म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, त्याने 96 टेस्ट सामन्यांमध्ये 47.61 च्या सरासरीने 5570 धावा केल्या आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये विकेटकिपर फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू हा दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाउचर आहे. त्याने एकूण 147 टेस्टमध्ये 30.30 च्या सरासरीने 5515 धावा केल्या आहेत. या यादीत धोनी 90 टेस्ट सामन्यांमध्ये 38.09 च्या सरासरीने 4876 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंतने आतापर्यंत 34 कसोटी सामन्यात 44.79 च्या सरासरीने 2419 धावा केल्या आहेत. त्यामुळे ऋषभ पंतला जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट विकेटकिपर फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.