Rishabh Pant : `मी नेहमीच ऋणी राहीन`, प्राण वाचविणाऱ्या रिअल लाईफ HERO ना भेटून ऋषभ पंत भावूक
Rishabh Pant Tweet : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला होता. या भयानक अपघातातून पंत मृत्यूच्या दाढेतून परत आला. ऋषभ पंतचे प्राण वाचविणारे ते दोन नायक हॉस्पिटलमध्ये तब्येतीची विचारपूस करायला गेले तेव्हा पंत म्हणाला की..,
Rishabh Pant Health Update : टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) भयानक अपघातातून थोडक्यात बचावला. मात्र या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. 30 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीहून रुरकीला जात असताना त्याची गाडी डिव्हायडरला धकली. या अपघातात कारने पेट घेतली. या दुर्घटनेत पंतच्या डोक्याला, हाताला, कमेरला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. पंतवर सध्या मुंबईतील (Mumbai News) कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये (Kokilaben Ambani Hospital) उपचार सुरु आहेत. पंतने पहिल्यांदाच त्याचा आरोग्याविषयी सोशल मीडियावर अपडेट (Rishabh Pant Health Update) दिली. त्यावेळी ज्या दोन तरुणांनी ऋषभ पंतचा जीव वाचविला त्यांनी हॉस्पिटलमध्ये त्याचा प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी पंत फार भावूक झाला होता.
'मी नेहमीच ऋणू राहीन'
ज्यावेळी पंतच्या कारला अपघात झाला तेव्हा गाडीने पेट घेतल. अशावेळी गाडी कोण आहे हे माहिती नसतानाही देवदूत म्हणून धावत आलेले दोन व्यक्ती...म्हणजे बस ड्रायव्हर आणि कंडक्टर...यांनी जळत्या कारमधून पंतला बाहेर काढलं. या दोघांचे नाव आहे रजत कुमार आणि निशू कुमार...या दोघांनी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये पंतची भेट घेतली. रजत कुमार आणि निशू कुमार या दोघांचे आभार मानण्यासाठी पंतने ट्विटरवर एक मनापासून पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये पंतने रजत आणि निशू यांना 'हिरो' म्हणून संबोधले आहे. (rishabh pant emotional Tweet thanks two heroes for helping him during accident and Rishabh Pant Health Update in marathi news )
पंत म्हणाला की....
“मी प्रत्येकाचे वैयक्तिकरित्या आभार मानू शकतं नाही. पण मी या दोन हीरोंचा ऋणी आहे. त्यांनी माझा अपघात झाल्यानंतर मदत केली आणि मी सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचलो. रजत कुमार आणि निशू कुमार, धन्यवाद. मी सदैव कृतज्ञ आणि ऋणी राहीन,” असं लिहित पंत भावूक झाला.
पंतने पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया
या अपघातानंतर ऋषभ पंतने पहिल्यांदाच सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. त्याने ट्विट करून बीसीसीआय आणि जय शाह यांचे आभार मानले. तो पुढे म्हणाला की, 'मी सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आणि शुभेच्छांसाठी नम्र आणि कृतज्ञ आहे. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती देताना मला आनंद होत आहे. माझी तबियत दिवसेंदिवस सुधारते आहे आणि मी पुढील आव्हानांसाठी तयार आहे.'