Rishabh Pant Health Update : टीम इंडियाचा (team India) स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला होता. (Rishabh Pant Car Accident) रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर गावाजवळ पंतची कार रेलिंगला जोरात धडकली. त्यानंतर रिषभला देखील मार लागला होता. मात्र, रिषभ या अपघातातून थोडक्यात बचावला होता. त्यानंतर आता रिषभ पंतच्या चाहत्यांसाठी खुशखबर समोर आलीये. रिषभच्या मेडिकल टीमने (BCCI Medical Team) दिली मोठी अपडेट दिली आहे. (Rishabh Pant Health Update Good news for fans the medical team gave a big update latest news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघातानंतर ऋषभ पंतला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर आता पंतला या आठवड्यात डिस्चार्ज (Rishabh Pant Discharge) मिळू शकतो. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिलीये.


काय म्हणाले बीसीसीआयचे अधिकारी?


ऋषभच्या तब्येतीत (Rishabh Pant Health Update) चांगली सुधारणा होत आहे. वैद्यकीय पथकाकडून (Medical Team) एक चांगली बातमी समोर आली आहे. पहिली शस्त्रक्रिया (Surgery) यशस्वी झाली. ऋषभला या आठवड्यात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. एक महिन्यानंतर त्याला आणखी एका सर्जरीची गरज आहे. त्याचा निर्णय डॉक्टर्स घेतील. 


आणखी वाचा - Rishabh Pant Car Accident : ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानात परतणार की नाही? समोर आले 'हे' धक्कादायक कारण


बीसीसीआयची मिडिकल (Medical Team) टीम सतत डॉक्टरांच्या संपर्कात आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलच्या मॅनेंजमेंटसह आमचा संपर्क आहे. आम्हाला आनंद आहे की, तो लवकरच संघात पुनरागमन करेल, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलंय.


दरम्यान, अपघात डुलकीमुळे झाला नाही तर खड्ड्यामुळे झाला. रात्रीची वेळ होती. त्यामुळे स्पष्ट दिसत नव्हतं. एक खड्डा होता, तो वाचवण्यासाठी गेल्यावर अपघात झाला, असं रिषभने (Rishabh revealed about accident) सांगितलं होतं.