Rishabh Pant Health Update: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत कार अपघातात गंभीररित्या जखमी झाला होता. 30 डिसेंबरला ही घटना घडली होती. जखमी ऋषभ पंतला तात्काळ डेहरादूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून ऋषभ पंतवर उपचार सुरु आहेत. ऋषभ पंतची प्रकृती आता स्थिर असून सुधारणा होत आहे. ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती देताना सांगितलं की, त्याला आयसीयूमधून खासगी वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. पाच डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. तसेच ऋषभ पंतही उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  ऋषभ पंतच्या मणक्याचे आणि मेंदूचे सीटी स्कॅन आणि एमआरआय अहवाल सामान्य आहेत. मात्र, त्याच्या घोट्याला, टाचांना आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. हाडात कोणतेही मोठे फ्रॅक्चर झालेले नाही. बीसीसीआयचे डॉक्टर मॅक्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती आहे . ऋषभ पंतच्या पायाच्या लिगामेंटवर उपचार कुठे होणार? याबाबतचा निर्णय बीसीसीआय घेणार आहे. लिगामेंटवर उपचार केल्यानंतर व्यवस्थित होण्यासाठी दोन ते सहा महिने लागू शकते. यामुळे जवळपास 6 महिने ऋषभ पंत क्रिकेटपासून लांब राहण्याची शक्यता आहे. भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिज आणि आयपीएल 2023 खेळता येणार नाही, असंच चित्र आहे. 


बातमी वाचा- न्यू ईयर पार्टीत Prithvi Shaw चा जल्लोष, 'मिस्ट्री गर्ल'सोबत झाला स्पॉट


ऋषभ पंतची क्रिकेट कारकिर्द


ऋषभ पंतने आतापर्यंत 33 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात 56 डावात फलंदाजी केली असून 2271 धावा केल्या आहेत. यात 159 ही सर्वोत्तम खेली आहे. त्याने एकूण 5 शतकं आणि 11 अर्धशतकं झळकावली आहेत. ऋषभ पंतने एकूण 30 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैरी 26 सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली. त्याने एकूण 865 धावा केल्या आहेत. त्यात 125 ही सर्वोत्तम खेळी आहे. 1 शतकं आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत. ऋषभने 66 टी 20 सामने खेळला आहे. त्यापैकी 56 डावात 987 धावा केल्या. त्यात 65 ही सर्वोत्तम खेळी आहे. यात त्यानी तीन अर्धशतकं ठोकली आहेत. आयपीएलमध्ये ऋषभ पंत एकूण 98 सामने खेळला असून 97 डावात 147.97 च्या सरासरीने 2838 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.