Urvashi Rautela सोबतच्या वादावर Rishabh Pant ची नवीन पोस्ट, आरोपांवर दिलं प्रत्युत्तर
उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यातला वाद नेमका आहे तरी काय? जाणून घ्या संपुर्ण प्रकरण
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद सुरु आहे. विशेष म्हणजे या वादात दोघेही एकमेकांचं नाव न घेता आरोप करत आहेत. त्यामुळे या वादाची चर्चा आता सर्वंत्र पसरली आहे. या वादावर आता पुन्हा एकदा ऋषभ पंतने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने उर्वशी रौतेला प्रतिउत्तर दिल्याचं बोललं जातंय. त्यामुळे नेमकं हे संपुर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.
पोस्टमध्ये काय?
ऋषभ पंतने (Rishabh Pant) इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये एक मेसेज लिहिला आहे. या मेसेजमध्ये 'ज्या गोष्टींवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही त्यावर ताण देऊ नका' असे लिहण्यात आले आहे. या मेसेजचा अर्थ असा लावण्यात येत आहे की, समोरून होणाऱ्या आरोपांवर तुम्ही कुठल्याही प्रकारचं नियंत्रण ठेवू शकत नाही. मात्र एक गोष्ट तुमच्या हातात आहे ती म्हणजे, जास्त ताण घेऊ नका. ऋषभ पंतच्या या स्टोरीचा हा स्क्रिनशॉट आता तुफान व्हायरल होत आहे.दरम्यान ऋषभ पंतने या मेसेजच्या माध्यमातून उर्वशी रौतेला प्रतिउत्तर दिल्याचं बोललं जातंय. दोनचं दिवसांपुर्वी तिने ऋषभ पंतचा (Rishabh Pant) उल्लेख 'छोटू भैया' आणि 'आरपी' करत आरोप केले होते.
उर्वशीच्या पोस्टमध्ये काय?
उर्वशीनं (Urvashi Rautela) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये उर्वशी म्हणाली, 'छोटू भैय्याने बॅट बॉल खेळायला पाहिजे. मी काही मुन्नी नाही, जी तुझ्यासारख्या लहानमुलांसाठी बदनाम होईल. छोटू भैयाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. शांत बसलेल्या मुलीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नका, अशा प्रकारचं प्रत्युत्तर तिने ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) आरोपावर केले होते.
ऋषभची उर्वशीबद्दल पोस्ट?
काही दिवसांपुर्वीचं ऋषभनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक नोट शेअर केली होती, ज्यामधून त्याच्या चाहत्यांनी असा अंदाज लावला होता की त्यानं ती पोस्ट उर्वशीसाठी लिहिली होती. विशेष म्हणजे यामध्ये त्यानं कोणाचेही नाव घेतले नव्हतं.
ऋषभने लिहिले की, 'प्रसिद्धी आणि बातम्यांमध्ये राहण्यासाठी काही लोक मुलाखतींमध्ये कसं खोटं बोलतात हे विचित्र आहे. काही लोकांना नाव कमावण्याची आणि प्रसिद्ध होण्याची भूक असते हे पाहणं दुःखदायक आहे. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो. या पोस्टसोबतच्या हॅशटॅगमध्ये ऋषभने लिहिले की, 'मेरा पीछा छोड़ो बहन और झूठ की भी लिमिट होती है'. ही पोस्ट लिहून ऋषभनं (Rishabh Pant) डिलीट केली होती.
मुलाखतीत उर्वशी काय म्हणाली?
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशीने (Urvashi Rautela) दावा केला होता की, दिल्लीत तिच्या एका शूटिंगदरम्यान कोणीतरी तिला भेटण्यासाठी रात्रभर वाट पाहत होतं. तो म्हणाला, 'मिस्टर आरपी (RP) हॉटेलच्या लॉबीत आले आणि मला भेटायला थांबले. 10 तास त्यांनी मला फोन केले. मी मात्र इतकी थकले होते की मी गाढ झोपी गेले आणि मला त्यांचा फोन येऊन गेला लक्षातच आलं नाही. वगैरे वगैरे... खूप काही ती बोलली. पण, जेव्हा RP कोण? असा प्रश्न विचारला तेव्हा मात्र मी नाव नाही सांगणार असंच तिनं स्पष्ट केलं होत.
सोशल मीडियावर ब्लॉक
अभिनेत्रीनं एका क्रिकेटरला डेट करत असल्याचा दावा केल्यानंतर उर्वशी आणि ऋषभ पंत यांची नावं जोडली जाऊ लागली. मात्र, ऋषभनं अशा सर्व बातम्यांचे खंडन केले आणि उर्वशीला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर ब्लॉकही केले होते.
अद्याप तरी या प्रकरणात दोघेही एकमेकांचे नाव न घेता बेछुट आरोप करत सुटले आहेत. या वादावर पुढे काय होते? या वादावर पडदा पडतो कि वाद वाढतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.