Rishabh Pant Car Accident: ऋषभ अजूनही ICU मध्येच, पंतच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर!
Rishabh Pant Health Update: अपघातात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) डोक्याला, पाठीला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली होती. बीसीसीआयचे डॉक्टर मॅक्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती आहे. अशातच मोठी अपडेट समोर आली आहे.
Rishabh Pant Accident: टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारचा भीषण (Car Accident) अपघात झाला. आगीने खाक झालेल्या गाडीमधून ऋषभ थोडक्यात बचावला आहे. सध्या ऋषभ पंतवर डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये (Max Hospital) उपचार सुरू आहेत. त्याच्या अनेक तपासण्याही झाल्या आहेत. अशातच त्याच्या आरोग्याविषयीची (Rishabh Pant Health Update) मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आता ऋषभच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलंय. (rishabh pant latest health update and medical condition details team india captain rohit sharma talked with doctor marathi news)
अपघातात ऋषभ पंतच्या डोक्याला, पाठीला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली होती. प्रकृतीत बरीच सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी (Rishabh Pant Doctors) दिली आहे. मात्र, त्याला अद्याप दुसऱ्या रुग्णालयात हालवण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. सध्या ऋषभ आयसीयूमध्ये (ICU) असल्याने हा निर्णय घेतल्याचं समजतंय.
सध्या नववर्षाच्या मुहुर्तावर मालदीवमध्ये (Maldives) एन्जॉय करत असलेला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Team India Captain Rohit Sharma) देखील ऋषभ पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली. त्यामुळे आता रोहित शर्मावर (Rohit Sharma) कौतूकाचा वर्षाव होताना दिसतोय.
दरम्यान, बीसीसीआयचे डॉक्टर मॅक्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती आहे आणि त्याला इतर कोणत्या रुग्णालयात हलवायचे की नाही याचा निर्णय देखील बीसीसीआयचे डॉक्टर्स (BCCI Doctors) घेतील. अपघात डुलकीमुळे झाला नाही तर खड्ड्यामुळे झाल्याची माहिती स्वत: ऋषभने दिली होती. खड्डा वाचवण्यासाठी गेल्यावर अपघात झाला. त्यानंतर आता पंत 2 महिन्यांत मैदानावर येईल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.