Rishabh Pant On Delhi Capitals : आयपीएल 2025 (IPL 2025) च्या मेगा ऑक्शनला आता अवघे काही दिवस शिल्लक असून 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे ऑस्कन होणार आहे. यंदाच्या ऑक्शनमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) , श्रेयस अय्यर, केएल राहुल अशा स्टार प्लेअर्सचे सुद्धा आयपीएलमधील भवितव्य या ऑस्कनमधून ठरेल. ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असतानाही मेगा ऑक्शनपूर्वी फ्रेंचायझीने त्याला रिटेन केलेलं नाही. माजी क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) हे मेगा ऑक्शनपूर्वी स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात दिल्लीने त्यांचा कर्णधार ऋषभला रिटेन का केलं नाही याच कारण समजावत होते. मात्र हे कारण पंतला पटलेलं दिसलं नाही त्यामुळे स्वतः ऋषभने व्हिडीओखाली कमेंट करत गावसकरांना चोख उत्तर दिलं. सध्या त्याची कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


व्हिडीओमध्ये पंत विषयी काय म्हणाले सुनील गावसकर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनील गावसकरने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हंटले की, 'मला वाटतं की दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतला आपल्या संघात परत घेईल. कधी कधी जेव्हा कोणत्या खेळाडूला रिटेन करायचे असते तेव्हा अपेक्षेप्रमाणे फ्रेंचायझी आणि खेळाडूंमध्ये फी बाबत बोलणी होते. जर की फ्रेंचायझीने त्यांच्या काही खेळाडूंना रिटेन केलं. त्यांनी नंबर एक रिटेन्शन फी ची अधिक मागणी केली आहे. त्यामुळे साहजिकच मला वाटते की तेथे काही मतभेद असू शकतात. परंतु मला असं वाटतं की दिल्ली ऋषभ पंतला परत आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करेल'. 


ऋषभ पंतने दिल चोख उत्तर : 


माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांचे व्हिडिओद्वारे म्हणणे होते की, 'ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात फी बाबत काही मतभेद झाले असावेत. पण ते पंतला ऑस्कनमधून पुन्हा संघात घेण्याचा प्रयत्न करतील'. यावर ऋषभने त्याच्या ऑफिशल अकाऊंटवरून कमेंट करत म्हटले की, 'माझ्या रिटेन्शनचा निर्णय हा पैशांशी संबंधित नव्हता हे मी नक्की सांगू शकतो'. ऋषभ पंतने कमेंट करून त्याने केवळ पैशांसाठी दिल्ली कॅपिटल्स सोडली नाही असे स्पष्ट केले. 


पाहा व्हिडीओ : 




दिल्ली कॅपिटल्सने कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन? 


आयपीएल 2025 मेगा ऑस्कनपूर्वी दिल्ली कॅपिटल्सने चार खेळाडूंना रिटेन केलं आहे. यात अक्षर पटेलला 16.5 कोटी, कुलदीप यादवला 13.5 कोटी, ट्रिस्टन स्टब्सला 10 कोटी आणि अनकॅप विकेटकीपर अभिषेक पोरेलला 4 कोटींना रिटेन करण्यात आले. 


ऋषभ पंतने 2 कोटी बेस प्राईजवर नोंदवलं नाव : 


2016  पासून ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सशी जोडला गेला होता. मात्र यावेळी त्याने मेगा ऑक्शनमध्ये येण्याचा निर्णय घेतला असून त्याने 2 कोटी बेस प्राईजवर आपलं नाव नोंदवलं आहे. उत्कृष्ट विकेटकिपर आणि फलंदाज असलेल्या ऋषभ पंतवर अनेक संघ बोली लावण्याची शक्यता आहे.  पंतने आयपीएलमध्ये आतापर्यंत 111 सामने खेळले असून यात त्याने 3284 धावा केल्या असून यात 18 अर्धशतक आणि 1 शतकाचा समावेश आहे. 


किती खेळाडूंनी मेगा ऑक्शनसाठी केली नोंदणी : 


24 आणि 25 नोव्हेंबर रोजी आयपीएल 2025 चं मेगा ऑक्शन क्रिकेट चाहत्यांना जिओ सिनेमावर लाईव्ह पाहता येणार आहे. या ऑस्कनसाठी देश विदेशातील एकूण 1574 खेळाडूंनी नोंदणी केली. नोंदणी केलेल्या 1574 खेळाडूंमध्ये 320 कॅप खेळाडू, 1224 अनकॅप खेळाडू आणि असोसिएट नेशन्समधील 30 खेळाडूंचा समावेश आहे. 1574 खेळाडूंनी नोंदणी केली असली तरी प्रत्यक्ष आयपीएलसाठी एकूण 204 स्लॉट्स आहेत.