मुंबई : टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंतने 2020-21 मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ब्रिस्बेन कसोटीत टीम इंडियाने कमाल केली. गाबा टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव करून भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली होती. याच सिरीजमधील पहिल्या सामन्यात 36 रन्सवर ऑल आऊट होऊन सिरीज जिंकणं हा एक ऐतिहासिक क्षण मानला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा ऐतिहासिक विजय आजही आठवून भारतीय चाहत्यांना टीम इंडियाचा फार अभिमान वाटतो. पण, तिसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाला खूप संघर्ष करावा लागला. मात्र, हा सामना अनिर्णित ठेवण्यात भारताला यश आलं होतं. या सामन्यात पंतला शतक पूर्ण करता आलं नाही. मात्र आता वर्षभराने त्याने याबाबत मोठा खुलासा केला आहे.


पुजारामुळे हुकलं Rishabh Pant चं शतक?


बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. टेस्ट सिरीजचा तिसरा सामना सिडनीमध्ये खेळला जात होता. 400 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया थोडी अडखळली. पण, हनुमा विहारी आणि अश्विनने शेवटच्या दिवशी फटकेबाजी करत सामना ड्रॉ केला.


या सामन्यात ऋषभ पंतने 97 रन्स केले आणि अवघ्या 3 रन्सने त्याचं शतक हुकले. अशा परिस्थितीत आता मोठा खुलासा करत या परिस्थितीला पुजाराला जबाबदार ठरवलंय. पुजाराने त्याला शतकाच्या जवळ आल्याची आठवण करून दिली नसती आणि सिंगल-डबल घेण्यास सांगितलं नसतं, तर तो आऊट झाला नसता, असं पंतने म्हटलं आहे. 


ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या या दौऱ्यासंदर्भात एक डॉक्युमेंट्री रिलीज करण्यात आली आहे. 'बंदो मे था दम' असं या डॉक्युमेंट्रीचं नाव आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये बोलताना ऋषभ पंत म्हणाला की, ऋषभ विकेट राखून ठेवण्याचा प्रयत्न कर. सिंगल डबलसहही तू सहज करू शकतो. तुला फोर मारण्याची गरज नाही. हे ऐकून मला खूप राग आला होता.


पंत पुढे म्हणाला, "दरम्यान, यामुळे माझं लक्ष शतक पूर्ण करण्याकडे वळलं. तसे, मी खेळताना माझे नियोजन स्पष्ट ठेवतो. त्या काळात मी शतक झळकावलं असतं तर ते माझ्यासाठी सर्वात खास ठरलं असतं."


पंतचं शतक 3 रन्सने हुकलं होतं. आऊट झाल्यानंतर पंत जेव्हा पव्हेलियनमध्ये परतत होता तेव्हा तो खूप निराश झाला होता. ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्यानंतर त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. 


पंतच्या प्रतिक्रियेबद्दल सांगताना रहाणे म्हणाला की, "तो ड्रेसिंग रूममध्ये आता तेव्हा फार वैतागला होता. त्याने सांगितले की पुजाराने मला आठवण करून दिली की मी 97 वर आहे. हे मलाही माहीत नव्हते. त्याने मला याबाबत सांगितलं नसतं तर मी माझे शतक पूर्ण केलं असतं."