टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतला मोठा धक्का, रेल्वेने केली मोठी कारवाई
रेल्वने अशी कारवाई नेमकी का केली याबाबत धक्कादायक कारण समोर आलं आहे. (
Rishabh Pant roorkee House Railway : टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ (Team India Star Player Rishah Pant) पंतच्या घरासमोर रेल्वेने मोठी कारवाई केली आहे. पंतसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. रेल्वे विभागाने त्याच्या घरासमोर खांब रोवले आहेत. रेल्वने अशी कारवाई नेमकी का केली याबाबत धक्कादायक कारण समोर आलं आहे. (Rishabh Pant roorkee house railway pillars erected latest marathi sport news)
नेमकं काय आहे प्रकरण?
रेल्वे विभागाने ऋषभ पंतच्या घरासमोर खांब रोवले आहेत. या कारवाईमुळे ऋषभ पंतचं घरही अडचणीत येण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे कर्मचाऱ्यांनाही तिथे देखरेखीसाठी ठेवले आहेत. जर कोणी हे खांब हटवायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. ऋषभ पंतच्या उत्तराखंडमधील रुरकी शहरातील घरासमोर रेल्वे विभागाने ही कारवाई केली आहे.
रेल्वेच्या जमिनीवर लोकांनी अतिक्रमण केलं आणि त्या ठिकाणी पार्किंग बवनत जागांवर ताबा मारला आहे. दिवसेंदिवस लोकांनी मोठ्या भूखंडावर ताबा मारला. अखेर रेल्वेने या जागांवर ज्यांनी ताबा मारला आहे तिथे जाऊन खांब रोवले आहेत. आधी लोकांना आम्ही नोटीस दिली होती. मात्र तरीही लोकांनी जमिनीवर अतिक्रमण केलं म्हणून आम्ही कारवाई केल्याचं वरिष्ठ अधिकारी ब्रज मोहन सिंह यांनी सांगितंल.
दरम्यान, ऋषभ पंत आता बांगलादेश दोऱ्यावर असून पहिल्या पहिल्या कसोटीमध्ये त्याला मोठी खेळी साकारता आली नव्हती. ऋषभ टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा महत्त्वाचा खेळाडू आहे.