गुवाहाटी : भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमधून ऋषभ पंतनं वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं पंतला त्याची वनडे कॅप दिली. याचबरोबर पंतनं एक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं. भारताकडून तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये (टेस्ट, वनडे, टी-२०) क्रिकेट खेळणारा पंत कमी वयाचा दुसरा खेळाडू बनला आहे. वनडे कारकिर्द सुरु करताना पंतचं वय २१ वर्ष आणि १७ दिवस आहे. हे रेकॉर्ड ईशांत शर्माच्या नावावर आहे. ईशांतनं १९ वर्ष आणि १५२ दिवसाचा असताना क्रिकेटचे तिन्ही फॉरमॅट खेळले होते. ऋषभ पंतहा भारताकडून वनडे खेळणारा २२४वा खेळाडू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी टीममध्ये असल्यामुळे मुळात विकेट कीपर असलेल्या पंतला या मॅचमध्ये बॅट्समन म्हणून खेळवण्यात आलं आहे. इंग्लंड दौऱ्यात टेस्ट सीरिजमधली कामगिरी आणि घरच्या मैदानात वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्टमधल्या कामगिरीमुळे ऋषभ पंतला वनडे टीममध्येही संधी देण्यात आली. 


पंतनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये ९२ आणि दुसऱ्या टेस्टमध्येही ९२ रन केले. इंग्लंडमधून पंतनं त्याच्या टेस्ट कारकिर्दीची सुरुवात केली. टेस्ट क्रिकेटमधली पहिलीच रन पंतनं सिक्स मारून केली. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये पंतनं शानदार शतकही केलं. पंतनं आत्तापर्यंत ५ टेस्ट मॅचच्या ८ इनिंगमध्ये ४३.२५ च्या सरासरीनं ३४६ रन केले आहेत. यामध्ये एक शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. 


ऋषभ पंतनं ४ टी-२० मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. यात त्यानं १०५.७९ च्या स्ट्राईक रेट आणि २४.३३ च्या सरासरीनं ७३ रन केले.