मृत्यूला मात देऊन 40 दिवसांनी स्वतःच्या पायांवर उभा राहिला Rishabh Pant; शेअर केला पहिला फोटो
10 फेब्रुवारी रोजी पंतने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊटवरून 2 फोटो पोस्ट केले आहेत.
Rishabh Pant Photo : डिसेंबर अखेरीस टीम इंडियाचा स्टाफ विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) चा भीषण कार अपघात झाला. ज्यामध्ये त्याच्या गंभीर दुखापत (Rishabh Pant car accident) झाली होती. यामुळे क्रिकेटपासून त्याला बरेच काळा लांब रहावं लागणार आहे. दुखापतीमुळे तो चाहत्यांपासूनही काही काळ दूर होता. मात्र नुकतंच पंतने त्याचा फोटो इन्स्ट्राग्रामवर आणि ट्विटरवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये पंत कुबड्यांच्या सहाय्याने चालताना दिसतोय. पंतची होणारी रिकव्हरी पाहून त्याचे चाहते मात्र फार खूश झाले आहेत.
Rishabh Pant अपघातानंतर शेअर केला पहिला फोटो
10 फेब्रुवारी रोजी पंतने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊटवरून 2 फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तो उन्हात कुबड्यांच्या मदतीने चालताना दिसतोय. याशिवाय त्याच्या उजव्या पायाला प्लॅस्टर घातल्याचं दिसतंय. ज्यामुळे त्याला जमीनीवर पाय ठेवायला त्रास होतोय.
फोटोला दिलं सूचक कॅप्शन
तब्बल 40 दिवसांनी पंत त्याच्या पायांवर उभा राहिला आहे. हे फोटो पोस्ट करताना त्याने एक कॅप्शन देखील दिलंय. कॅप्शनमध्ये ऋषभ पंत म्हणतो, एक पाऊल पुढे, एक पाऊल मजबूत आणि एक पाऊल योग्य...!
पंतचा झाला होता गंभीर अपघात
ऋषभ पंतचा 30 डिसेंबर रोजी सकाळी अपघात झाला होता. तो स्वत: गाडी चालवत घरी जात होता. यावेळी त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दिल्ली-डेहराडून महामार्गावर त्याची कार डिव्हायडरला धडकली. यानंतर ऋषभच्या गाडीला आग लागली. काही लोकांनी त्याला तातडीने गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केलं. यावेळी ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती देण्यात आली होती.