सिडनी : टीम इंडियाचा युवा विकेटकीपर ऋषभ पंतसाठी ऑस्ट्रेलिया दौरा आठवणीत राहिल असा आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनसोबत झालेला वाद असो किंवा सिडनीमध्ये ठोकलेलं शतक असेल. भारताचा विकेटकीपर चांगलाच चर्चेत आला आहे. पंतचे फॅन्स देखील आता वाढले आहेत. सिडनी टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी पंतने शतकीय खेळी केली. पण पंत आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. ऋषभ पंतने मैदानात केलेला स्टंट सध्या व्हायरल होतो आहे. ऋषभ पंतने ड्रिंक्स ब्रेक दरम्यान हा स्टंट केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंत ड्रिंक ब्रेकदरम्यान पाठीवर झोपला होता. तेव्हा अचानक त्याने स्टंट करत उभा राहिला. मैदानात पंतने केलेल्या या स्टंटनंतर त्याच्या फिटनेसची चर्चा सुरु झाली आहे. सिडनी टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने १५९ रन केले. ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट शतक ठोकणारा तो पहिला आशियाई विकेटकीपर ठरला.



पंत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये शतक ठोकणारा दुसरा विकेटकीपर बनला आहे. याआधी फक्त विंडिजच्या जैफ डुजनने मॅनचेस्टर आणि पर्थमध्ये शतक करण्याची कामगिरी केली होती. याशिवाय पंत एका टेस्ट सीरीजमध्ये २०० रन करणारा आणि २०० कॅच पकडणारा पहिला आशियाई विकेटकीपर बनला आहे.


ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध त्याने सिरीजमध्ये ३५० रन केले आहेत. पंतने विराट कोहलीला देखील मागे टाकलं. विराटने या सिरीजमध्ये २८२ रन केले. चेतेश्वर पुजाराने ५२१ रन केले आहेत.