मुंबई : आयपीएलच्या 15 व्या सिझनला सुरुवात झाली असून नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमावला. मुंबईचा यंदाच्या 15 व्या सिझनमधील पहिला सामना हा दिल्ली विरुद्ध झाला. या सामन्यात दिल्लीने मुंबईचा पराभव केला. या पराभवासह मुंबईने 2013 पासूनची पराभवाची मालिका कायम ठेवली आहे. तर या पराभवनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत मुंबई इंडियन्सने 177 रन्स केले. मात्र 178 रन्सचं हे लक्ष्य दिल्लीने 10 बॉल्स राखत पूर्ण केलं आणि मुंबईवर विजय मिळवला. दरम्यान या पराभवानंतर सोशल मीडियावर मजेदार मीम्स व्हायरल झाले आहेत. 


यावेळी एका युझरने, पहिला सामना जिंकला नाहीये, तर संपूर्ण टूर्नामेंट जिंकलायची असल्याची पोस्ट केली आहे. तर दुसऱ्या युझरने 'रोहित शर्मा पराभवानंतर, आमचं असचं असतं' हे म्हणत असल्याची गमतीशीर पोस्ट केलीये. 





इतकंच नाही तर, मुंबई पहिला सामना हरूनही 5 वेळा आयपीएल जिंकली आहे, अशा आशयाचा मीमही व्हारल झाला. याशिवाय पंत रोहित शर्माला जा, जाऊन वडापाव खाऊन ये, असा सल्ला देतानाचा मीम एकाने पोस्ट केला आहे.





मुंबईला 2013 पासून प्रत्येक मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. मुंबईने आयपीएलमधील आपला पहिला सामना हा अखेरीस 2012 मध्ये जिंकला होता. तेव्हा मुंबईने चेन्नईवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता. दरम्यान मुंबई इंडियन्सवर लागलेला हा डाग पुसून काढण्यासाठी पुढील 16 व्या सिझनची वाट पाहावी लागणार आहे.