Rishabh Pant vs Kuldeep Yadav : टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी बांगलादेशचा संघ भारतात येणार आहे. त्यासाठी टीम इंडियाची घोषणा झालीये. यामध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत याची निवड करण्यात आलीये. अपघातानंतर तब्बल 21 महिन्यांनंतर ऋषभने कमबॅक केलंय. ऋषभला आयती संधी मिळाली नसून ऋषभने दुलीप ट्रॉफीमध्ये आपल्या फलंदाजीची जादू दाखवली होती. मात्र, ऋषभच्या फलंदाजीपैक्षा त्याची मजेशीर करामती चर्चेचा विषय आहेत. अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ पंतच्या दुसऱ्या डावातील फलंदाजीमुळे इंडिया बी संघाला विजय मिळवता आला होता. अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखाली इंडिया बी संघाने दणदणीत विजय मिळवला. त्यावेळी सामन्याच्या चौथ्या दिवशी विकेटकिपिंग करताना ऋषभने फलंदाजी करणाऱ्या कुलदीप यादवची चांगलीच फिरकी घेतली. ऋषभने कुलदीपला डिवचण्यास सुरूवात केली. नेमकं काय संभाषण झालं ते पाहुया...


ऋषभ पंत विकेटकिपिंग करताना म्हणाला, सगळेजण तयार रहा सिंगलसाठी... तो सिंगल धाव घेणार आहे. त्यावर फलंदाजी करणाऱ्या कुलदीपने लगेच उत्तर दिलं. 'मी नाही घेणार'. मग गप्प बसेल तो ऋषभ कसला. घे आई शप्पथ आणि सांग नाही घेणार, असं म्हणत ऋषभने लगेच पलटवार केला. त्यानंतर दोन्ही खेळाडू हसले अन् फलंदाजी सूरू झाली. त्यानंतर ऋषभने कुलदीपला डिवचण्यासाठी पुन्हा डाव खेळला. हा पुढच्या तीन ओव्हरमध्ये आऊट होणार, अशी भविष्यवाणी ऋषभने विकेट्सच्या मागे उभ्या उभ्या केली अन् त्यानंतर दुसऱ्याच ओव्हरमध्ये विकेट गेली. 


पाहा Video



बांगलादेश संघाच्या दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक


बांगलादेश संघाचा भारत दौरा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 19 तारखेला पहिली कसोटी चेन्नईत खेळवली जाणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर 6 ऑक्टोबरला ग्वाल्हेरमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू होईल. दुसरा टी-20 सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत, तर तिसरा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबाद च्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.