Rishabh Pant Car Accident: कार अपघातात भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) गंभीर जखमी झाला आहे. अजूनही तो रिकव्हर झाला नसून त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. डॉक्टरांनी ऋषभ पंतवर  पुन्हा एकदा  शस्त्रक्रिया निर्णयाचा घेतला आहे. यामुळे ऋषभ पंतची पूर्णपणे ठीक होण्यास आणखी वेळ लागणार आहे (Rishabh Pant Health Update). यामुळे ऋषभ पंत याच्या आशिया कप (Asia Cup) आणि वर्ल्डकपमध्ये (World Cup)  खेळण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

30 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीहून रुरकीला जात असताना ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला. जीवाला धोका नसला तरी ऋषभ पंत याच्या गुडघ्याला आणि पायाच्या इतर भागाला मोठी दुखापत झाली आहे. जखमी ऋषभ पंतला तात्काळ डेहरादूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. 


मुंबईतील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये ऋषभ पंतवर उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान पंतच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.  ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार पुन्हा एकदा ऋषभ पंतवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी कमीत कमी सहा आठवडे थांबावे लागते. यामुळे ऋषभ पंतवर सुरु असलेल्या ट्रीटमेंटचा कालावधी आणखी  लांबणार आहे.


कसा झाला ऋषभ पंतचा अपघात?


दिल्लीवरून घरी परतत असताना ऋषभ पंतची कार रेलिंगला धडकली आणि हा अपघात झाला. रेलिंगला धडक दिल्यानंतर कारने  पेट घेतला. काही वेळातच ऋषभ पंतची कार जळून खाक झाली. सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 


यामुळे जवळपास 6 महिने ऋषभ पंत क्रिकेटपासून लांब राहण्याची शक्यता आहे. भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिज आणि आयपीएल 2023 खेळता येणार नाही, असंच चित्र आहे. त्याचे चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.