मुंबई: आयपीएलमधील 27 वा सामना बंगळुरू विरुद्ध दिल्ली यांच्यात झाला. हा सामना चुरशीचा पाहायला मिळाला. वानखेडे स्टेडियमवर दिनेश कार्तिकच्या शेवटच्या ओव्हरमध्ये तुफान बॅटिंग पाहायला मिळाली. तर मॅक्सवेलच्या अर्धशतकी खेळीनं बंगळुरूला विजय मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरू टीमने दिल्लीला 16 धावांनी पराभूत केलं. दिल्लीच्या पंतने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. मात्र तो निर्णय बंगळुरूने चुकीचा ठरवला. बंगळुरूच्या बॉलर्सनी दिल्लीच्या फलंदाजांना घाम फोडला आणि त्यांना विजयापासून रोखण्यात यशस्वी ठरले. 


बंगळुरूच्या फलंदाजांची दमदार कामगिरी


पहिल्या 3 ओव्हरमध्ये ओपनिंग फलंदाज अनुज रावत आणि फाफची विकेट उडाली. अवघ्या 13 धावांवर बंगळुरूचे दोन गडी गेले होते. मॅक्सवेलने 34 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 षटकार ठोकून 55 धावा केल्या. 


मॅक्सवेलच्या कामगिरीमुळे टीमचं मनोबल वाढलं आणि टेन्शन कमी झालं. त्यापाठोपाठ आलेल्या दिनेश कार्तिकने 34 बॉलमध्ये 66 धावा केल्या. शाहबाज अहमदने 21 बॉलमध्ये 32 धावा केल्या. बंगळुरूने 189 धावांचं आव्हान दिल्लीसमोर ठेवलं. 


दिल्लीचा फ्लॉप शो 


दिल्ली टीमने 7 गडी गमावून 173 धावा केल्या. 16 धावा विजयासाठी कमी पडल्या. डेव्हिड वॉर्नरने 38 बॉलमध्ये 66 धावा केल्या. पंतने 17 बॉलमध्ये 34 धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाजांची चांगलीच तारांबळ उडाली. 


बंगळुरू टीमचा हा चौथा विजय आहे. तर दिल्ली टीमचा हंगामातील तिसरा पराभव आहे. बंगळुरूने 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 जिंकले असून 2 सामन्यात पराभव हाती आला आहे. बंगळुरूसाठी प्ले ऑफपर्यंत पोहोचण्याची आशा अधिक दृढ झाली आहे.