Rishabh Pant Video: भारतीय क्रिकेट टीमचा फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानातून दूर आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस ऋषभ पंत (Rishabh Pant) च्या गाडीचा अपघात गंभीर अपघात झाला होता. यानंतर त्याच्या पाठीला तसंच डोक्याला मार लागला. यानंतर पंत क्रिकेट खेळू शकत नाहीये. वेळोवेळी ऋषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या फिटनेसबाबत अपटेड (Fitness Update) देत असतो. मात्र आता ऋषभ पंतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर केलाय, ज्यामध्ये तो पूलमध्ये चालताना दिसतोय.


कुबड्यांच्या सहाय्याने पाण्यात उतरला ऋषभ पंत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टावर पोस्ट केलेला हा ऋषभचा हा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये पंत पूलमध्ये दिसतोय. यावेळी पंत कुबड्यांच्या सहाय्याने पूलमध्ये चालताना दिसतोय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये पंतने लिहिलंय की, छोट्या, मोठ्या आणि त्यातील प्रत्येक गोष्टीसाठी मी आभारी आहे.


पंतच्या व्हिडीओवर रवी शास्त्रींची कमेंट


पंतने हा व्हिडीओ पोस्ट करताच त्याची हेल्थ अपडेट पाहता, चाहत्यांनी यावर लाईक्सचा पाऊस पाडला. यावेळी टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी लाईक करत त्यावर कमेंट देखील केली आहे. रवी शास्त्री त्यांच्या कमेंटमध्ये म्हणतात की, हे सुरु असू दे पंत! याशिवाय इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी देखी पंतच्या आरोग्याची सुधारणा पाहून टाळ्या वाजवण्याची कमेंट केली आहे.



अपघातानंतर पहिल्यांदाच दाखवला पूर्ण चेहरा


डिसेंबरमध्ये ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. यानंतर पंतवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये त्यांची फिजियोथेरेपीची ट्रिटमेंटही सुरु आहे. ज्यामध्ये पंत हळू-हळू चालण्याचा प्रयत्न करतोय. 15 मार्च म्हणजेच आज त्याने कुबड्यांच्या सहाय्याने पूलमध्ये चालतानाचा व्हिडीओ शेअर केला. दरम्यान यापूर्वी फेब्रुवारीमध्ये कुबड्यांच्या सहाय्याने चालतानाचा एक फोटो पोस्ट केला होता.


बुद्धीबळ खेळतानाचा फोटोही केला होता पोस्ट


यापूर्वी पंतने इन्स्टाग्राम स्टोरीवर बुद्धीबळ खेळतानाचा एक फोटो पोस्ट केला होता. पंतचा बुद्धीबळ खेळण्याची आवड आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने प्रश्न विचारला होता की, तुम्ही अंदाज लावू शकता का, की कोण खेळतंय. याशिवाय नुकतंच त्याने छतावर बसलेलं असताना व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये भरपूर हवा सुटली होती आणि पंत त्या हवेत छतावर बसला होता.