मोहाली : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा हिटमॅन रोहित शर्माने नाबाद डबल सेंच्युरी झळकावली. त्याने १५३ चेंडूत नाबाद २०८ धावा चोपल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या वनडेत त्याने अक्षरश: धावांची टांकसाळ उघडली. शतक पूर्ण झाल्यानंतर रोहितने जोरदार फटकेबाजी सुरु केली. प्रत्येक षटकांमध्ये षटकार, चौकार सुरुच होते. डबल सेंच्युरी झळकावताना १२ षटकार तर १३ चौकार ठोकले. 


रोहितने जेव्हा डबल सेंच्युरी ठोकली तेव्हा रोहितची पत्नी रितिकाला आनंदाने अश्रू अनावर झाले होते. आज रोहित-रितीकाचा लग्नाचा वाढदिवस. या दिवशी रोहितने डबल सेंच्युरी झळकाल्याने हा वाढदिवस अधिकच खास झाला. 


रोहितने सेंच्युरी झळकावताच रितीकाच्या दिशेने कॅमेरा गेला. यावेळी रोहितच्या शतकी खेळीने रितीकाला आनंदाश्रू आवरले नाहीत.