मुंबई : क्रिकेटर रॉबिन उथप्पा आज ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय स्तरावर रॉबिन उथप्पा फार खेळला नाही. तसेच त्याच्या वैयक्तित जीवनातही अनेक चढ उतार आले. पण रॉबिनची आठवण टी- २० मॅच दरम्यानच्या एका खेळासाठी नक्की होते. 


रॉबिन हा अनेकदा विकेट किपिंग आणि वेगवान गोलंदाजी करताना दिसला आहे. त्याच्या अद्भूत प्रत्यय काही वर्षांपूर्वी भारत - पाकिस्तान मॅच दरम्यान आला होता.  


कोणती होती ही मॅच ? 
टी २० मॅचमध्ये रॉबिनने एकच बॉल फेकला, पण त्यानेच इतिहास रचला आहे. पाकिस्तान विरुद्ध खेळताना त्याने हा बॉल टाकला. जो सरळ स्टंपवर लागला आणि भारताने क्रिकेट इतिहासात पहिल्यांदा आणि शेवटचा 'बॉल आऊट' जिंकला.   


टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या विरोधात ग्रुप मुकाबल्यामध्ये रॉबिनने हा विक्रम केला होता. एकापाठोपाठ भारतीय खेळाडू पॅवेलियनमध्ये परतत होते. अशावेळेस रॉबिनने दमदार कामगिरी केली होती. मोहम्मद आसिफच्या वेगवान गोलंदाजीवर रॉबिनने ३९ बॉलमध्ये ५० धावा केल्या होत्या. यामध्ये ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. 


२००२ साली उथप्पा १७ व्या विषयी कर्नाटक संघातून रणजी क्रिकेट खेळायला लागला. त्यापूर्वी तो कर्नाटक संघात त्याने फर्स्ट क्लास डेब्यू केला होता. पहिल्याच सामन्यात ६१ धावा केल्या होत्या. रॉबिन उथप्पाने २००४ मध्ये अंडर १९ वर्ल्ड कप संघातदेखील होता.