विम्बल्डन : स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररनं विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत चौथी फेरी गाठलीय. तिस-या फेरीत फेडररनं जर्मनीच्या मिशा झ्वेरेवचा पराभव केलाय. 7-6, 6-4, 6-4 अशी सरळ सेटमध्ये फेडररनं मिशावर मात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक क्रमवारीत 35 वर्षीय फेडरर पाचव्या, तर 29 वर्षीय मिशा झ्वेरेव तिसाव्या क्रमांकावर आहे. यापूर्वी हे दोघे चार वेळा आमनेसामने आले होते. या चारही लढतीत फेडररने बाजी मारली होती. 


यावेळी फेडरर आणि मिशा यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. सुमारे पावणेदोन तास रंगलेल्या मॅचमध्ये अखेर फेडररला वर्चस्व मिळवण्यात यश आलं. 


चौथ्या फेरीत आता फेडररची लढाई ऑस्ट्रियाच्या 23 वर्षीय डॉमनिक थिमशी होणार आहे. दिग्गजांना पराभवाचे धक्के देणारा टेनिसस्टार अशी डॉमनिकची ओळख आहे. त्यामुळे चौथ्या फेरीत कडवी फेडरर आणि डॉमनिक थीम यांची कडवी लढत पाहायला मिळेल.