Rohit Sharma Always Remember This Thing : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 चं विजेतेपदं पटकावलं होतं. रोहित शर्माचा स्वभाव हा विसरभोळा असून तो बऱ्याच गोष्टी विसरतो. याविषयी त्याचे टीम मेंबर्स सुद्धा त्याची खिल्ली उडवताना पाहायला मिळतात. परंतु टीम इंडियाचा बॅटिंग कोच विक्रम राठोड याने एका अशा गोष्टीविषयी सांगितले जी रोहित कधीही विसरत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माचा मित्र आणि स्टार क्रिकेटर विराट कोहलीने सुद्धा एका मुलाखतीत सांगितले होते की रोहित अनेकदा त्याचा फोन, आयपॅड, पासपोर्ट, घड्याळ इत्यादी गोष्ट विसरला आहे. तर एकदा रोहित हॉटेल रूमवर चक्क त्याची वेडिंग रिंग विसरला होता. एवढेच नाही तर एकदा न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यात झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये रोहित शर्मा टॉस जिंकून नक्की बॅटिंग निवडायची की बॉलिंग हेच विसरला होता. 


काय म्हणाले विक्रम राठोड? 


एका पॉडकास्टमध्ये विक्रम राठोडने रोहित शर्माबाबत बोलताना म्हंटले की, टीम बसमध्ये तो काहीना काही विसरून जातो. कधी फोन विसरेल तर कधी आयपॅड तर कधी इतर सामान. एकदा हे पाहणं मजेशीर होतं  की टॉसच्यानंतर रवी शास्त्री यांनी त्याला टीममध्ये कोणते प्लेअर्स खेळणार असं विचारलं तेव्हा रोहित दोन मिनिट ते आठवत राहिला आणि मग त्याने उत्तर दिले होते.  


हेही वाचा : विनेश फोगट उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात? थेट बहीण बबिताशी होणार सामना?


 


रोहित शर्मा काय विसरत नाही? 


बॅटिंग कोचने सांगितले की, "रोहितची सर्वात बेस्ट क्वालिटी आहे की तो एक दमदार फलंदाज आहे. त्याला गेम प्लान माहित असतो आणि त्याबाबत तो क्लिअर असतो. जेव्हा तुम्ही लीडर असता तेव्हा तुम्हाला फ्रंट लीड करून परफॉर्मन्स सुद्धा द्यायचा असतो आणि रोहित शर्मा तो देतो. कर्णधार म्हणून त्याची रणनीती खूप चांगली आहे. कोणत्या परिस्थितीत काय करायचं हे त्याला नेमकं माहित असतं. रोहित काहीही विसरतो पण त्याला त्याचा गेम प्लान नेहमी लक्षात राहतो".