श्रीलंका विरुद्ध वनडे सीरिजमध्ये दारुण पराभव झाल्यावर आता टीम इंडियाची नजर ही सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिजवर असणार आहे. बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज आणि दोन सामान्यांची टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. यासाठी बांगलादेशची टीम भारत दौऱ्यावर येणार असून 19 सप्टेंबर पासून दोन्ही टीममध्ये टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा हेड कोच म्हणून गौतम गंभीरची ही पहिली टेस्ट सीरिज असणार आहे. गंभीरने टीम इंडियाच्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफीमध्ये खेळायला सांगितले. तर केवळ रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह सारख्या दिग्गज खेळाडूंना यापासून आराम दिला आहे. मोहम्मद शमी दुखापतीच्या कारणामुळे ही टेस्ट सीरिज खेळणार नाही. तर भारताने टी 20 वर्ल्ड कपपूर्वी इंग्लंड सोबत टेस्ट सीरिज खेळली होती. त्या टीममध्ये सामील काही खेळाडूंना बांगलादेश विरुद्ध सीरिजमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही असं बोललं जातं आहे. 


रजत पाटीदार :


इंग्लंड विरुद्ध याच वर्षी रजत पाटीदारने टेस्ट सीरिजमध्ये डेब्यू केला होता. त्याला सीरिजमधील तीन सामने खेळण्याची संधी मिळाली. पण तो या संधीचं सोनं करू शकला नाही. 3 टेस्टच्या 6 इनिंगमध्ये त्याने 32, 9, 5, 0, 17, 0 अशा धावा केल्या. केएल राहुल टीममध्ये परतल्यावर रजत पाटीदारला टीम इंडियात टेस्ट सीरिजसाठी पुन्हा संधी मिळणं अवघड आहे. 


देवदत्त पडिक्कल :


फलंदाज देवदत्त पडिक्कल याने सुद्धा भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये डेब्यू केला होता. यात त्याला केवळ 1 सामना खेळण्याची संधी मिळाली. पडिक्कलने धर्मशाला येथे झालेल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 65 धावा केल्या, पण दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पडिक्कलने इंग्लंड विरुद्ध जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन केले असले तरी देखील त्याला बांगलादेश विरुद्धच्या सीरिजमध्ये संधी दिली जाणार नसल्याची शक्यता आहे.


केएस भरत :


भारतासाठी आतापर्यंत 7 टेस्ट सामने खेळलेल्या केएस भरतला बांगलादेश विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये संधी मिळणे अवघड आहे. याच कारण म्हणजे इंग्लंड विरुद्ध दोन टेस्ट सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र यात तो सपशेल अपयशी ठरला. म्हणून ध्रुव जुरेल याला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली होती. तर कार अपघातात झालेल्या दुखापतीनंतर रिषभ पंत सुद्धा टीममध्ये परतला आहे. त्यामुळे यंदा बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये रिषभ पंतला संधी मिळेल असं मानलं जात आहे.  


आकाश दीप :


आकाश दीप याने इंग्लंड विरुद्ध रांची येथे झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये डेब्यू केला होता. मोहम्मद शमी हे दुखापतग्रस्त असल्याने आकाश दीपची  निवड करण्यात आली होती. आता सुद्धा शमी नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेत आहे, त्यामुळे जर शमीला बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीज खेळण्यासाठी संधी मिळाली तर आकाश दीपचा पत्ता कट होऊ शकतो. 


भारत विरुद्ध बांगलादेश सिरीज वेळापत्रक : 


भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट आणि दोन सामन्यांची टी 20 सीरिज खेळवली जाणार आहे. 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान पहिला सामना चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. तर 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान दुसरा टेस्ट सामना पार पडेल जो उत्तर प्रदेशच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर येथे खेळवला जाईल.   तर 6 ऑक्टोबर रोजी बांगलादेश विरुद्ध टी 20 सीरिजमधील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे होईल. तसेच दुसरा सामना हा 9 ऑक्टोबर रोजी अरुण जेटली स्टेडियमवर पार पडेल.