नवी दिल्ली : क्रिकेट विश्वात सध्या टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचं पहायला मिळत आहे. टीम इंडियाचे बॅट्समन आणि बॉलर्स नव-नवे रेकॉर्ड्स आपल्या नावावर करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक रेकॉर्ड्स असे आहेत ज्यामध्ये टीम इंडियाचेच प्लेअर्स एकमेकांना टक्कर देत आहेत. असाच एक रेकॉर्ड म्हणजे वर्षभरात सर्वाधिक सिक्सर लगावण्याचा आहे. या रेकॉर्डसाठी टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन रोहित शर्मा आणि ऑलराऊंडर हार्दिक पांड्या यांच्यात चढाओढ सुरु झाली आहे.


२०१७ वर्ष संपत आलं आहे, अशात एका वर्षामध्ये सर्वाधिक सिक्सर लगावण्याचा रेकॉर्ड या दोन प्लेअर्स पैकी कुणाच्या नावावर होणार हे लवकरच कळणार आहे.


वन-डे क्रिकेटमध्ये २०१७ या वर्षातील आकड्यांवर नजर टाकली तर सर्वाधिक सिक्सर लगावणाऱ्या बॅट्समनमध्ये रोहित शर्मा अव्वल आहे. रोहित शर्माने या वर्षात १७ इनिंगमध्ये ३१ सिक्सर लगावले आहेत. या लिस्टमध्ये टीम इंडियाचाच ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याच्याकडून आव्हान मिळत आहे.


हार्दिक पंड्याच्या नावार २०१७ या वर्षात ३० सिक्सर आहेत. म्हणजेच रोहित शर्माच्या तुलनेत हार्दिक पांड्या केवळ १ सिक्सरने पिछाडीवर आहे. इतकेच नाही तर, हार्दिकने ३० सिक्सर १६ इनिंग्समध्ये लगावले आहेत.


रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यातील सिक्सर मारण्याची चढाओढ येत्या महिन्यात आणखीन वेगाने होण्याची शक्यता आहे. कारण, २०१७च्या शेवटपर्यंत टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध एक वन-डे मॅचसोबतच श्रीलंकेविरोधात ३ वन-डे मॅचेस खेळायच्या आहेत.