मुंबई : भारतीय संघ मेलबर्नमध्ये खेळलेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून सीरीजमध्ये एक पाऊल पुढे टाकलं आहे. याबरोबरच भारतीय खेळाडू रोहित शर्मासाठी अत्यंत महत्वाची आणि गोड बातमी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माच्या घरी 2018 च्या अखेरीस चिमुकल्या पावलांच आगमन झालं आहे. रोहित शर्माच्या पत्नीने रितिका सचदेवने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 


रोहितला ही गोड बातमी कळताच त्यांने मुंबईकडे रवाना होणारं विमान पकडलं आहे. रोहित शर्मा लवकरच आपल्या मुलीला पाहणार आहे. 


रोहित आणि रितिकाचं हे पहिलं बाळ असून रितिकाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या सीरिजच्या शेवटच्या टेस्ट सामन्यात रोहित शर्मा आता खेळणार नाही. 



मेलबर्नमध्ये रोहित शर्माने उत्तम खेळ दाखवला असून त्याने अर्धशतक केलं होतं. रोहितच्या जागी आता सिडनी टेस्ट मॅचमध्ये ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सहभागी होणार आहे. 


वर्षअखेरीस रितिका सचदेवने 30 डिसेंबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या बातमीमुळे रोहित शर्माचे सर्व चाहते आनंदी झाले असून उत्तम खेळासोबतच रोहितने आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. 



रितिकाची चुलत बहिण आणि अभिनेता निर्माता सोहेल खानची पत्नी सीमा खानने याची माहिती इंस्टाग्रामवरून दिली आहे. 


रोहितने स्वतः देखील या अगोदर तो लवकरच बाबा होणार असल्याची माहिती त्याने दिली होती. तसेच रविवारी रितिकासोबत फोनकॉलचा फोटो देखील त्याने शेअर करून Sunday Family Time असं म्हटलं होतं.