मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला अजून विजयाचा सूर गवसलेला नाही. काल पुण्यातील एमसीएच्या मैदानावर केकेआर विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक झाली आहे. केकेआरने मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सने पराभव केला. दरम्यान या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा संतापला होता. याचा व्हिडीयोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 व्या सिझनमधील मुंबईचा हा सलग तिसरा पराभव होता. केकेआरचा पॅट कमिन्स या सामन्याचा हिरो ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात कोलकाताकडून झालेल्या दारूण पराभवानंतर टीमचा कर्णधार रोहित शर्मा संतापलेला दिसत होता. सामना संपल्यानंतर जेव्हा रोहित शर्मा मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलत होता तेव्हा त्याचा राग दिसून आला. त्याचा हा संतप्त व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतंय.


सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, आमची फलंदाजी चांगली झाली नाही, शेवटच्या 4-5 ओव्हरमध्ये 70+ रन्स करण्यासाठी फलंदाजांनी खूप प्रयत्न केले. त्याचप्रमाणे आम्ही ठरल्याप्रमाणे गोलंदाजीही केली नाही. मात्र पॅट कमिन्सने शानदार कामगिरी केली.



पॅट कमिन्सच्या वादळी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईने कोलकाताला  विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताने हे विजयी आव्हान 5 विकेट्स गमावून 16 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला.


कोलकाताकडून पॅटने सर्वाधिक 15 चेंडूत 6 खणखणीत सिक्स आणि 4 चौकारांसह नाबाद 56 धावांची खेळी केली. तर वेंकटेश अय्यरने 41 बॉलमध्ये  6 फोर आणि 1 सिक्ससह 50 धावा केल्या.