गेल्या काही दिवसांपासून भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्या आल्या होत्या. धनश्री वर्माने इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचे आडनाव धनश्री वर्मा चहलवरून बदलून धनश्री वर्मा केल्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. त्याचवेळी युजवेंद्र चहलनेही नव्या आयुष्याबद्दल एक पोस्ट केली. त्यामुळे दोघांमध्ये काही वाद झाला का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र नंतर चहलने सोशल मीडियावर याला केवळ अफवा असल्याचे म्हटले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला (rohit sharma) याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर तो चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय संघ आशिया कप स्पर्धेत (asia cup 2022) रविवारी पाकिस्तानसोबत भिडणार आहे.  या सामन्यापूर्वी दोन्ही संघ दुबईत जोरदार सराव करत आहेत. या सामन्याचे कव्हरेज करण्यासाठी अनेक देशांतील पत्रकार यूएईला पोहोचले आहेत.


सोशल मीडियावर याबाबत एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि युजवेंद्र चहल काही पत्रकारांशी बोलत आहेत. त्यावेळी रोहित शर्माने तेथे उभ्या असलेल्या पत्रकारांना विचारले की ही (चहलबाबत) चर्चा कोणी सुरू केली, त्याच्यासोबत माझी ओळख करून द्या, असे म्हटले. यादरम्यान एका पत्रकाराने सांगितले की, मला माहित आहे की हे कोणी केले आहे. त्यावर रोहित शर्मा म्हणाला की कोण आहे ते सांगा? मात्र, पत्रकाराने त्यांचे नाव सांगितले नाही.



दरम्यान, भारतीय संघ आशिया कप 2022 मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघ जोरदार तयारी करताना दिसत आहे.  गेल्या वर्षीच्या टी20 विश्वचषकानंतर भारत-पाकिस्तान प्रथमच आमनेसामने येणार आहेत.