India vs New Zealand: टीम इंडिया सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंडविरूद्धची सीरिज देखील टीम इंडियाने स्वतःच्या खिशात घातली आहे. न्यूझीलंडविरूद्ध मंगळवारी झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांनी कमाल करत विजय मिळवून दिला. यावेळी भारताचा लॉर्ड शार्दुल म्हणजेच शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) विजयाचा खरा शिल्पकार ठरला. मात्र या सामन्यात शार्दुलसोबत अशी एक घटना घडली ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारच्या सामन्यात एक वेळ अशी आली होती, ज्यावेळी 2 विकेट्स घेऊन देखील कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीशी खुश नव्हता. याचं कारण म्हणजे एका ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉल्समवर कॉन्वेने सलग 2 फोर मारल्या होत्या. यामुळे रोहित शर्मा शार्दुलवर (Rohit Sharma angry on shardul thakur) संतापला होता.  


भर मैदानात रोहितने शार्दुलला सुनावलं


कॉन्वेने शार्दुलला सलग 2 फोर मारल्यानंतर रोहित निराश झाला. रोहित तातडीने शार्दुल ठाकूरकडे गेला आणि त्याला 10 सेकंद चांगलंच सुनावलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पुन्हा एकदा भर मैदानात रोहित शर्माचा रूद्र अवतार पहायला मिळाला. मुख्य म्हणजे, संतापलेल्या रोहितचं म्हणणं शार्दुल देखील शांतपणे ऐकून घेत होता. 



शार्दुल ठाकूर ठरला 'मॅन ऑफ द मॅच'


शार्दुल ठाकूरला तिसऱ्या वनडे सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. तर मॅन ऑफ द सीरिजचा रेकॉर्ड शुभमन गिलला देण्यात आला. तिसऱ्या वनडे सामन्यात शार्दूल ठाकूरने 3 विकेट् काढून टीमला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उटलला.


टीम इंडियाचा न्यूझीलंडला क्लिन स्विप


आगामी वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर खेळवण्यात येत असलेल्या वनडे सिरीजमध्ये टीम इंडिया पास झाल्याचं पहायला मिळतंय. प्रथम श्रीलंका दहन केलं. त्यानंतर आता किंवींचा खात्मा करत टीम इंडियाने आयसीसीच्या रॅकिंगमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आणि सीरिजमध्ये 3-0 ने दणदणीत विजय मिळवला आहे.


कर्णधाराची तुफान खेळी


तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने 83 बॉल्समध्ये त्याचं शतक पूर्ण केलं आहे. यामध्ये रोहितने 9 फोर आणि 6 सिक्स लगाववे आहेत. दुसऱ्या बाजूने शुभमन गिलने देखील शतक ठोकलं आहे. गेल्या 4 सामन्यांमध्ये शुभमन गिलचं हे तिसरं शतक आहे. यासह रोहित शर्मा आता वनडेत सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. रोहित आणि ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पाँटिंग यांच्या नावावर 30-30 शतकं आहेत.