IND vs AUS 3rd Test : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. यावेळी इंदूरमध्ये तिसरा टेस्ट (IND vs AUS 3rd Test) सामना खेळवण्यात येतोय. तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा (Team India) खेळ काही फारसा चांगला झाला नाही. अवघ्या 109 रन्सवर टीम इंडिया ऑलआऊट झाली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची टीमने हळूहळू चांगली सुरुवात केली. यावेळी ऑस्ट्रेलियाचा डाव सुरु असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) गोलंदाज रविंद्र जडेजावर (Ravindra Jadeja) संतापलेला दिसला. 


रोहितने जडेजाला केली शिवीगाळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया फिल्डींग करत असताना ही घटना घडली आणि याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो. झालं असं की, 109 वर ऑलआऊट झाल्यावर फिल्डींगला आलेलं असताना टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये काहीसं तणावाचं वातावरण होतं. अशातच रोहित शर्मा काही कारणाने रविंद्र जडेजावर चिडलेला दिसला. यावेळी त्याने जडेजाला अपशब्द वापरले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


 



 


टीम इंडियाचे फलंदाज ठरले फ्लॉप


रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताचे फलंदाज फ्लॉप गेले. टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला 30 पेक्षा अधिक रन्स करता आले नाहीत. यावेळी विराटने सर्वाधिक म्हणजेच 22 रन्स केले. त्यानंतर शुभमन गिलने 21 रन्सची खेळी केली. रोहित शर्मा 12, भरत 17 तर अक्षर पटेल 12 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतले. कांगारूंच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. 


स्मिथमुळे Rohit Sharma ला मिळालं जीवनदान


टीम इंडियाच्या पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क गोलंदाजीसाठी आला. त्याच्या ओव्हरचा चौथा बॉल रोहित शर्माच्या मिडल स्टंपवर पडला. रोहितने हा बॉल डिफेंड केला, मात्र हा बॉल जास्त बाऊंस झाल्यामुळे बॉल बॅटवर न लागता थेट पॅटवर लागला. यावेळी मिचेलने एलबीडब्ल्यूसाठी अपील ही केलं, पण मैदानातील अंपायरने याला नॉटआऊट करार दिला. 


स्टार्चने अपील केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने गोलंदाज आणि विकेटकीपरशी याबाबत बातचीत केली. यावेळी खात्री नसल्याने स्मिथने डीआरएस वाचवण्याचा निर्णय घेतला. मात्र यानंतर जेव्हा रिव्ह्यू दाखवण्यात आला तेव्हा रोहित (Rohit Sharma) एलबीडब्ल्यू आऊट असल्याचं दिसून आलं. अशातच स्मिथच्या एका चुकीच्या निर्णयाने रोहितला जीवनदान मिळालं.