मुंबई : रोहित शर्माच्या कर्णधार पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर टीम इंडिया चांगला खेळ करतेय. पहिल्यांदा न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि आता श्रीलंकेला देखील मात दिली आहे. श्रीलंकेविरूद्धची टी-20 सिरीज देखील टीम इंडियाने आपल्या नावे केली आहे. या सिरीजमधील दुसरा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकला आहे. रविंद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर या विजयाचे शिल्पकार ठरले. दरम्यान सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने काही खेळाडूंचं भरपूर कौतुक केलं आहे.


या खेळाडूंना रोहित शर्माने मानलं ग्रेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीममध्ये बऱ्याच काळानंतर कमबॅक केलेल्या संजू सॅमसनची रोहित शर्माने भरभरून कौतुक केलं आहे. कालच्या सामन्यात संजूने 39 रन्सची खेळी केली. यावेळी, आम्ही त्याला संधी देत राहू. त्याचा अधिक फायदा घेण्याची संधी त्याने सोडू नये, असं रोहित शर्माने म्हटलंय.


रोहित शर्मा म्हणाला, "संजू सॅमसनने दाखवून दिलंय की, तो किती चांगली खेळी खेळू शकतो. खेळाडूंना फक्त त्यांना व्यक्त करण्याची संधी हवीये. आम्हाला त्या खेळाडूंवर लक्ष द्यायचं आहे जे टीममध्ये आहेत आणि जवळपास आहेत. त्यासोबत श्रेयसने देखील मोठी खेळी खेळली. त्याचप्रमाणे जडेजानेही चांगला खेळ केला."


दरम्यान दुसरा सामना जिंकल्यानंतर रोहितने एक मोठं विधान केलं आहे. रोहितच्या म्हणण्यानुसार, तिसऱ्या टी-20 सामन्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.


रोहित पुढे म्हणाला, "आम्ही बसून टीममध्ये बदल करण्याबाबत चर्चा करू. आता आम्ही 27 खेळाडूंचा वापर केला आहे, कदाचित यापुढे अजून काहींचा वापर करू. जेव्हा तुम्ही सिरीज जिंकता तेव्हा असेही काही खेळाडू असतात ज्यांना संधी मिळत नाही."