बेंगळुरू : ऑस्ट्रेलिया विरूद्ध चौथ्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या रोहित शर्माने सिक्सर ठोकण्याची हाप सेंच्युरी पूर्ण केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या खेळीत रोहितने पहिले दोन सिक्सर मारल्यानंतर त्याने कांगारू विरुद्ध ५० सिक्सर लगावण्याचा अनोखा रेकॉर्ड त्याच्या नावावर केला. यासोबतच रोहित हा ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे सामन्यात ५० सिक्सर मारणारा जगातला पहिला खेळाडू ठरला आहे. 


या सामन्यात रोहितने ५५ बॉल्समध्ये शानदार ६५ रन्स केले. रोहितने या खेळीत १ फोर आणि ५ सिक्सर लगावले. मात्र विराट कोहलीसोबत खेळताना एक रन घेण्याच्या प्रयत्नात तो रनआऊट झाला. 


सिक्सर लगावण्याची बाबतीत ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक सिक्सर लगावण्यात रोहित शर्मा सर्वात पुढे आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया विरूद्ध ४३ आंतरराष्ट्रीय सामन्यात ४४ खेळींमध्ये एकूण ६५ सिक्सर लगावले आहेत. 


ऑस्ट्रेलिया विरूद्धचा हा रोहितचा २७वां वनडे सामना होता. या सामन्यात त्याने हा खास रेकॉर्ड त्याच्या नावावर केलाय. रोहितनंतर ऑस्ट्रेलिया विरूद्ध सर्वात जास्त सिक्सर लगावणारा दुसरा खेळाडू इंग्लंडचा इयॉन मोर्गन हा आहे. त्याने आतापर्यंत ४३ सामन्यामध्ये ३९ सिक्सर लगावले आहे. 


ऑस्ट्रेलिया विरूद्ध सर्वाधिक सिक्सर लगावणा-या दुसरा भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर हा आहे. सचिनने ऑस्ट्रेलिया विरूद्ध ७१ वनडे सामन्यांमध्ये ३५ सिक्सर लगावले आहेत.