मुंबई : टी-20नंतर विराट कोहलीची वनडेचं कर्णधारपदंही काढून घेण्यात आलं आहे. विराटच्या जागी रोहित शर्माला वनडे संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आलंय. कोणत्याही टीमचा कर्णधार बदलला की संघातही अनेक बदल होतात. प्रत्येक कर्णधाराला आपल्या आवडत्या खेळाडूंना संघात ठेवायचे असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर आता रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशा परिस्थितीत अनेक खेळाडूंचं करिअर धोक्यात आले आहे. हे खेळाडू विराट कोहलीचे फेव्हरेट राहिले आहेत. 


1. वॉशिंगटन सुंदर


वॉशिंग्टन सुंदर आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो. तो विराट कोहलीच्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. सुंदर टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो. त्याने भारतीय संघासाठी 26 टी-20, 1 एकदिवसीय आणि 4 कसोटी सामने खेळले आहेत. आता रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर त्याच्या जागी कृणाल पंड्या किंवा जयंत यादव संघासाठी खेळताना दिसण्याची शक्यता आहे


2. युजवेंद्र चहल


भारताच्या स्पिनर्सपैकी एक युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो. चहलची गणना विराटच्या खास खेळाडूंमध्ये केली जाते. चहलला T20 वर्ल्डकपमध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. त्याचवेळी मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या राहुल चहरला त्याच्या जागी ठेवण्यात आलं. आगामी काळात रोहित राहुल चहरला टीम इंडियामध्ये संधी देऊ शकतो.


3. मोहम्मद सिराज


मोहम्मद सिराज स्विंग बॉलिंगसाठी ओळखला जातो. सिराजने न्यूझीलंडविरुद्ध चमकदार कामगिरी करून कसोटी संघात आपलं स्थान पक्कं केलं आहे. परंतु त्याला वनडेमध्ये आपली प्रतिभा दाखवण्याची फारशी संधी मिळालेली नाही. रोहित कर्णधार बनल्यानंतर त्याला छोट्या फॉरमॅटमध्ये खेळणं कठीण वाटतंय.